बौद्ध तत्वज्ञानातील पुर्नजन्म म्हणजे काय ...? बौद्ध पुनर्जन्म सिध्दांत म्हणजे पुनर्निर्मिती..

जय भिम
बौद्ध तत्वज्ञानात पुनर्जन्म मानण्यात येतो असा दाखला लागलीच देण्यात येईल,परंतु ह्या सिद्धांताचा आत्म्याशी कोणताच अर्थाअर्थी संबंध नाही.बौद्ध पुनर्जन्म सिध्दांत म्हणजे पुनर्निर्मिती . निसर्गाची पुनरावृत्ती.पित्याच्या आकारासारखा चेहऱ्यामोहोऱ्याचा पुत्र होतो म्हणून तो काही संपूर्णपणे पिता नाही. याला बौद्ध तत्वज्ञानात पिता पुत्राच्या रूपाने जन्म घेतो असे म्हटले आहे. परंतु पित्यातील सर्व गुणांचा वास पुत्राच्या ठिकाणी राहू शकत नाही . कारण त्याबाबतीत पित्याबरोबर मातेचे गुण त्यात येतात. शिवाय वातावरणाचा परिणाम होतोच.
 एका आंब्यापासून दुसरा आंबा निर्माण होतो. त्याप्रमाणे चाललेल्या जगरहाटीला पुनर्निर्मिती म्हणतात. परंतु जमीन,पाणी,वारा, खत यांचा जोड परिणाम होऊन मूळ आंब्याला जसे मधुर फळ येईल तसेच दुसऱ्या आंब्याला येऊ शकेल असे नाही. कदाचित चांगला परिणाम झाला तर चांगले फळ येईल, वाईट झाला तर वाईट येईल.'शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी '. म्हणूनच एका प्रांतात विशेष फळ-फुल  झाडांची वाढ होते. इतरत्र ते जगू देखील शकत नाहीत. जसे चहा-कॉफी आसाम,निलगिरीत होते. नारळ समुद्र किनाऱ्यावरच वाढतात. संत्री चांगली मध्य-प्रदेशात नागपूरलाच होतात. मसाल्यासाठी जावा बेट प्रसिद्ध आहे. हापूस आंबा रत्नागिरी जिल्ह्यातलाच चवीला आणि रसाला चांगला. एकूण पूनर्निर्मितीच्या कार्यालाच पुनर्जन्म असे म्हटले आहे.

*डॉ बाबासाहेब आंबेडकर*
रायटिंग अँड स्पिचेस खंड 18, भाग 3,पेज नं 444,445
संकलन-रेवती पाझारे अलोने
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel