जयंती विशेष-विझती ज्योत प्रज्वलित ठेवणारी सवितामाई
*'विझती ज्योत' प्रज्वलीत ठेवणारी सवितामाई...!*
- संदिप आशा भिमराव...
@भाग - एक@
जयभीम मिञहो,केवळ ब्राम्हण म्हणुन सवितामाईंचा द्वेष करणारे अनेकजण बघितले...अनेक आरोप डाॅ.सवितामाई अर्थात माईसाहेबांवर केले गेले...ज्या माईसाहेबांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची 'विझती ज्योत' आयुष्यभर चालु ठेवली त्याच माईसाहेबांवर आरोप करणार्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सवितामाईंबद्दल कीती प्रेम होते हे संदर्भासह जाणुन घ्यावे...
डाॅ.सविता कबीर आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते म्हणजे कळत्या वयात उमलल्या फुलाचे प्रेम आहे...! बी.एन.राव हे बाबासाहेबांचे मिञ तर त्यांची कन्या डाॅ.शारदा कबिरांची जीवाभावाची मैञीण...त्यांच्याच घरी प्रथम बाबासाहेब आणि डाॅ.शारदांची भेट झाली.डाॅ.प्रा.राव यांच्या शिफारशीवरुन बाबासाहेब स्वतःच्या संपुर्ण तपासणीसाठी *ऑपेरा हाऊस*जवळील डाॅ.माधवराव मालवणकर यांच्याकडे आले होते.डाॅ.मालवणकरांनी त्यांची बारकाईने तपासनी केली आणि औषधांची लांबलचक यादी त्यांच्या हाती देऊन एम.डी.च्या शिक्षणासाठी आलेल्या डाॅ.कबीरांकडे त्यांना पाठवले.त्या बाबासाहेबांना कोणती गोळी दिवसातुन कीती वेळा आणि कशी घ्यावी हे समजाऊन सांगणार होत्या.
*"मी माईसाहेबांना बाबासाहेबांशी त्यांच्या पहील्या भेटीबद्दल विचारले होते त्यावेळी त्या काय बोलल्या"* हे जाणुन घेण्यासाठी चिञकार धनंजय कीर आपल्या *आंबेडकर चरिञात* लिहीतात,
*"....घटनेचा कच्चा आखारडा पुर्ण केल्यानंतर आंबेडकरांना विश्रांतीची आवश्यकता वाटु लागली.औषधोपचारासाठी ते म्हातारपणी मुंबईत आले.त्यापेक्षा उतारवयात म्हटले असते तर अधिक चांगले झाले असते.ज्या रुग्णालयात ता विश्रांती घेत होते,तेथेच अविवाहीत डाॅ.शारदा कबीर काम करीत होत्या.ऑगस्ट 1947 पासुन आंबेडकर आपल्या प्रकृतीने काळजीत होते.त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळंय होती.'गेले पंधरा दिवस आपला डोळ्याशी डोळा लागला नाही' असे पञ त्यांनी 1947 मध्ये कमलाकांत चिञे यांना लिहीले होते.राञ पडली म्हणजे त्यांना मोठी भीती वाटत असे.अनेक दिवस त्यांच्या मज्जातंतुचे दुखणे राञी होई.त्यांना कण्हत कुथत सर्व राञ काढावी लागे.त्या दिवसाय ते इन्सुलिन घेत असत.परंतु त्यांना कुठलेच औषध लागु पडेना.ते म्हणाले,'जे बरे होत नाही,ते सहन करण्यास मी आता शिकत आहे."* ऑगस्ट 1947 मध्ये मुंबईचे डाॅक्टर काय म्हणतात याविषयी त्यांनी त्या पञात चौकशी केली.
जानेवारी 1948 मध्ये लिहीलेल्या एका पञात त्यांनी अशी कहाणी सांगितली आहे की, *"आपल्या पायातील वेदना पहाटे सुरु होऊन दिवसभर चालु राहतात"*
त्यानंतर एका महीन्याने कमलाकांत चिञे यांना लिहीतात, *"माझी प्रकृती एकाएकी ढासळली आहे आणि दुखण्याने फीरुन उचल खालली आहे.चार दिवस डोळ्याशी डोळा लागलेला नाही.पायातील वेदना तर असह्यच झाल्या आहेत.राञभर जागरण करुन नोकरांना आपली सेवा करावी लागली.दिल्लीय दोन नामांकीय वैद्यांनी मला तपासले.त्यांचे मत असे पडले की,जर पायातील वेदने त्वरीत थांबल्या नाहीत तर त्या वेदना नेहमीच राहतील आणि कधीच नाहीश्या होणार नाहीत.माझ्या प्रकृतीची काळजी घ्यायला कोणीतरी माणुस पाहीजे,या तुमच्या सुचनेचा मी आता पुर्वीपेक्षा जास्त विचार करीत आहे.मी डाॅ.कबीर हीच्याशी विवाहबद्द व्हायचे ठरवले आहे.माझ्या पाहण्यात तिच्याइतकी योग्य जोडीदार दुसरी नाही.बरोबर असो वा चुक असो मी हा निर्णय घेतला आहे.याविषयी तुम्हास काही सांगावयाचे असल्यास कळवा."*
त्यानंतर नाशिकच्या भाऊराव गायकवाड यांनाही त्यांनी आपल्या संकल्पिय विवाहासंबंधी माहीती दिली.त्यात ते म्हणाले, *"पहील्या पत्नीच्या निधनानंतर पुन्हा लग्न न करण्याचा मी निर्णय घेतला होता,परंतु आता दुसरा विवाह करण्याचा मी निर्णय घेतला आहे.जी सुगृहीणी असुन वैद्यकशास्ञात पारंगत आहे अशा पत्नीची मला आवश्यकता आहे.अस्पृश्य समाजात अशी स्ञी सापडणे आज अशक्य असल्याने मी एका सारस्वत स्ञीची निवड केली आहे."*
प्रत्यक्षात त्याआधी बाबासाहेब कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना 25 डीसे.1946 मधील लिहीलेल्या पञात म्हणतात, *"माझ्याबद्दल सांगायचे तर मी दिल्लीला आजारी माणुस म्हणुनच मला आज डाॅक्टरांनी तपासले.त्यांनी रक्त चाचणी करुन भीतक व्यक्त केली की,माझी प्रकृती निश्चितपणे खालवत आहे.तुम्ही त्यांची चिंता करु नका.प्रकृती अचानक कोसळल्याने मी स्वतःला सावरीत आहे.जोपर्यंत आपल्या लोकांना जोखडातुन मुक्त होण्यासाठी माझी गरज आहे तोपर्यंत मी जिवंत राहणार आहे हा माझा करारीपणा आहे.तो खालावलेल्या प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या निराशावादातुन मला आधार देतो."*
दिनांक 16 मार्च 1948 च्या एका पञाचा शेवट करताना बाबासाहेब लिहीतात, *"...माझे आयुष्य एकाकी राहीले आहे की माझा हीन्दु धर्मातील माणसांशो संपर्कच राहीलेला नाही आणि हींदु स्ञीयांशी तर अजिबात नाही.नशीबाने मी एक स्ञी शोधु शकलो आहे.ती सारस्वत समाजाची आहे.सद्या ठरल्याप्रमाणे लग्न दिल्लीला 15 एप्रिल रोजी होईल.ही बातमी कोणालाच कळता कामा नये;गुप्तच ठेवा."*
हे लग्न प्रत्यक्षाय 15 एप्रिल 1948 रोजी झाले.पण त्याआधी दिल्लीत स्वतंञ भारताचा पहीला आतंकवादी नथुराम गोडसे या ब्राम्हणाने गांधींची हत्या केली.या घटनेचा परिणाम या दोघांवर पडला होता.त्यावेळी शारदा कबीर यांनी बाबासाहेबांना लिहीले, *"हा काय दुर्दैवीपणा म्हणावा की,'महार' म्हणवल्या जाणार्या नेत्याने 'पुणे करारा'वर सही करुन गांधीजींचे प्राण वाचविले आणि त्याच महाराष्ट्रातील ब्राम्हण म्हणविणार्या व्यक्तीने त्यांचे प्राण घ्यावे.याचे गुढ कळंतंच नाही"* यावर बाबासाहेबांनी लिहीले, *"एका महाराष्ट्रीयनच्या हातुन गांधींना मरण यायला नको होतं.या तुझ्या मताशी मी संपुर्णपणे सहमत आहे.मी त्याही पुढे जाऊन म्हणेल की,असे नीच कृत्य अन्य कोणीही केले असते तरी ते चुकीचे ठरले असते."*
.....क्रमशः...
जयंती विशेष - विझती ज्योत प्रज्वलीत ठेवणारी सवितामाई - भाग २

Leave Comments
Post a Comment