जयंती विशेष - विझती ज्योत प्रज्वलीत ठेवणारी सवितामाई
*'विझती ज्योत' प्रज्वलित ठेवणारी सवितामाई...!*
@भाग - दो
न@
बाबासाहेबांच्या पहील्या भेटीबद्दल कीर यांनी माईसाहेबांना विचारले असता माईसाहेब म्हणतात, *"त्यांनी (बाबासाहेबांनी) माझ्या हाती डाॅ.मालवणकर यांनी लिहुन दिलेल्या औषधांची यादी मी वाचुन पाहीली.मी त्यांना म्हणाले,'तुमच्या पत्नीला बोलवा!म्हणजे मी त्यांना सर्व समजाऊन सांगते.कारण यातील एकही डोस चुकता कामा नये'.त्यावर ते चटकन म्हणाले,'पण डाॅक्टर मी विधुर आहे'. खरंतर मला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हते.ते केंद्रात मंञी होते एवढेच मी माझ्या मैञीणीकडुन ऐकले होते.मी त्यांना एका रुग्णाची काळजी वाहणार्या एका डाॅक्टरच्या भुमिकेतुन सहज म्हणाले,'मग मी राहते तुमच्यासोबत दोन तीन महीने...' मग मला मध्येच तोडत अंगावर पाल पडावी तसे ते इंग्रजीतुन मला म्हणाले,'नको!नको!तुम्ही एवढ्या तरुण व सुंदर आणि मी विधुर.लोक काय म्हणतील'??"*
बघा वरील संभाषणातुन डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सवितामाई या दोघांत एकमेकांबद्दल आपुलकी असल्याचं सिद्ध होतं.
लग्न ठरल्याप्रमाणे डाॅ. शारदा कबीर आपल्या पाठच्या भावासोबत मुंबईहुन विमानेने आल्या.त्यांचा 15 एप्रिल 1948 रोजी नोंदणी पद्धतीने विवाह झाला आणि डाॅ.शारदा कबीर सवितामाई अर्थात माईसाहेब भिमराव आंबेडकर झाल्या.बाबासाहेबांचे अदराने त्यांना माईसाहेब म्हणु लागले.भरलेल्या स्वच्छ दुधाच्या ग्लासात साखर ज्याप्रमाणे विरघळुन जाते त्याप्रमाणे माईसाहेब बाबासाहेबांच्या जीवनात विरघळुन गेल्या आणि बाबासाहेबांच्या संसारात एकरुप झाल्या.त्याच दिवसापासुन माईसाहेब बाबासाहेबांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक झाले.त्यामुळे बाबासाहेब जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांना जावे लागत असे.
पुर्वी बंगल्यात शंकरलाल शास्ञी व सोहनलाल शास्ञी नामक बाबासाहेबांच्या स्नेहींचा सारखा वावर असायचा.त्यांच्या निरर्थक चर्चेने साहेबांना नाहक रक्तदाब होत असे,त्यामुळे माईसाहेबांनी त्यांचे येणेजाणे बंद करुन साहेबांची काळजी वाहीली माञ साहेबांचा आंतरराष्ट्रीय संबंध तुटणार नाही याचीही दक्षता ठेवली.
बाबासाहेबांनी 25 मे 1950 रोजी राजभोजनाला सोबत घेऊन सहकुटुंब श्रीलंका येथे 'बौद्ध धम्म परिषदे'ला हजेरी लावली आणि बौद्ध पुजापाठ कसे चालतात ते पाहावयास आलो आहोत असे सांगितले.साहेब जातील तिथे माईसाहेब त्यांच्यासोबत सावलीसारख्या सोबत असायच्या.अखेरच्या दिक्षा समारंभात जशा त्या त्यांच्या सोबत होत्या तशाच काठमांडु व भारतातील इतर बौद्ध स्थळांना भेटी देताणाही ते त्यांच्यासोबत राहुन तब्बेतीची काळजी घेत होत्या.त्या दोघांचे एकमेकांवय जीवापाड प्रेम होते.त्याची दोन उदाहरणे सांगण्यासारखी आहेत.
एकदा माईसाहेब न्युमोनियाने आजारी पडल्या.त्यावेळी वाचणाचे वेड असलेल्या बाबासाहेबांनी चार पाच दिव पुस्तकांना हात लावला नाही.येता-जाता माईसाहेबांजवळ ते बसुन होते.त्या जर गेल्या तर आपले काय होईल? कोण आपली काळजी वाहील? या शंकेने बाबासाहेब ग्रासले होते. *"शरु मला सोडुन जाऊ नकोस"* असं म्हणुन माईसाहेबांचा हात घट्ट पकडुन बाबासाहेब रडायचे.त्यात भरीस भर म्हणुन न्युमोनियाने माईसाहेबांच्या छातीत पाणी झाले होते.ते काढण्यासाठी डाॅक्टरांची तयारी पाहुन बाबासाहेब ओक्साबोक्शी रडत डाॅक्टरांना म्हणत, *"डाॅक्टर!माझ्या शरुला वाचवा."* मग स्वतः माईसाहेब त्यांना धीर देऊन सांगत होत्या, *"छातीतुन पाणी काढल्याने मीच काय कुणीच मरत नाही, बी शुअर आय एम विथ यु!"* तेव्हा बाबासाहेब थोडे शांत झाले होते.
एकदा दिल्लीहुन मुंबईला येताना बाबासाहेबांचे लॅटरीनच्या दारात जोरात बोटे दाबली गेली होती.आधीच त्यांनी बारिकसा ताप होता.त्यात बोटे दाबल्याने ते भ्रमिष्ठासारखे माईसाहेबांना हाक मारुन म्हणत, *"शरु!चल आपण जाऊया!"*त्यावर माईसाहेब विचारायच्या, *"कुठे?"* तेव्हा बाबासाहेब उत्तर देत नव्हते.तेव्हा घाबरलेल्या माईसाहेबांनी परत दिल्लीला जायचा निर्णय घेतला.पण टीसीने परतीच्या प्रवासासाठी रेल्वे उपलब्ध नसल्याने सांगितल्यावर त्यांनी परत मुंबईत जाण्याचे ठरवले.माईसाहेबांनी ते मुंबईत येत असल्याचे डाॅ.कमलकांत चिञे यांना कळविले होते.ते बाॅम्बे सेन्ट्रल स्टेशनवर हजेर होते.त्यांनी बाबासाहेबांसाठी दोन तीन तज्ञ डाॅक्टर्स बोलावले.ते 'लिबर्टी टाॅकीज' जवळच्या एका हाॅटेलात उतरले.थोड्याच वेळात डाॅक्टरांच्या टीमने साहेबांना ऑक्सीजनची नळी लावली आणि इतर उपचार सुरु केले.बाबासाहेब अर्धवट शुद्धीत होते.त्यावेळी ते माईसाहेबांना जवळ बसवुन त्यांचा हातात हात घेऊन माईसाहेबांना म्हणत, *"माझ्यानंतर काय होईल तुझे?याची चिंता वाटते."* माईसाहेब परोपरीने समजव होत्या, *"तुम्हाला काहीच होणार नाही,तुम्ही बरे व्हाल,तुम्ही चिंता करु नका,तुम्ही खरेच बरे होणार आहात."* आणि खरोखरंच बाबासाहेब चारच दिवसांत ठणठणीत झाले.तेव्हा माईसाहेबांनीदेखील सुटकेचा निःश्वास टाकला.
मे 1955 पासुन बाबासाहेबांची प्रकृती आयुष्यभराच्या अथक कष्टाने द्रुतगतिने ढासळंत होती.तरी माईसाहेब धीराने सर्व प्रसंगांना तोंड देत होत्या.श्र्वास घेताना साहेबांना ञास होत होता म्हणुन ते वेळोवेळी प्राणवायु देत होत्या.साहेबांचि तब्बेत जास्त ढासळली हे ऐकुन साहेबांचे अनुयायी भीतीने गोंधळुन जातील म्हणुन त्यांनी साहेबांच्या सांगण्यावरुन प्राणवायु गुप्त ठेवले होते.हीवाळ्यात त्यांच्या शरीराला यंञाने उब देण्यात येई.विद्युत स्नानही कधीकधी घालण्यात येई.प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणुन सर्व प्रयत्न करण्यात येत होते.बौद्ध धम्म दिक्षेसारखा कार्यक्रमही त्यांनी पार पाडला.नेपाळपर्यंत ते फीरुन आले माञ अखेर 6 डीसे. 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.त्याचबरोबर माईसाहेब नाहक शिव्यांच्या धनी झाल्या.आपल्या साहेबांसाठी त्यांनी तेही निमुटपणे सहन केले.आयुष्यभर ते हालहाल जीवन जगत राहील्या व आपल्या प्रामाणिकतेचा श्वास त्यांनी 2001 मध्ये सोडला...!
अशावेळी आजदेखील केवळ ब्राम्हण म्हणुन काही ब्राम्हणद्वेषी मंडळी माईसाहेबांचा तिरस्कार करतात.अशांना याचा विसर पडला काय की, *बाबासाहेबांनी आपल्या 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथाच्या प्रस्तावनेत स्वतःचा उल्लेख 'विझती ज्योत' करुन ठेवला आणि माईसाहेबांनी ती 'विझती ज्योत' आयुष्यभर प्रज्वलीत ठेवली.
खरे पाहता 1946/47 पासुनच बाबासाहेबांची प्रकृती खालावली होती...पुढे 1948 पासुन माईसाहेबांच्या अथक वैद्यकीय सेवेने बाबासाहेब बुद्ध धम्म दिक्षेपर्यंत आले...जर माईसाहेब सोबत नसते तर बाबासाहेबांना बुद्ध धम्म स्विकारण्याचे भाग्य लाभले असते काय याचा विचार माईसाहेबांचा द्वेष करणार्यांनी करायला हवा...!
जयभीम..!
समाप्त...!
संकलन..
- संदिप आशा भिमराव..

Leave Comments
Post a Comment