जाणून घ्या, "काय होता बाबासाहेबांचा 'कोलंबो प्लॅन'? "
काय होता बाबासाहेबांचा 'कोलंबो प्लॅन'? या प्लॅननुसार बाबासाहेबांनी ज्या ३१ मुलांना परदेशात (लंडन) येथे उच्चशिक्षण घेण्यास पाठवलं होतं तो उद्देश आज सफल झाला असं म्हणता येईल काय?समाजातील उच्चशिक्षित, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समाजाप्रती असलेली तळमळ, कार्य वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन सर्वांनी मोकळेपणाने यावर व्यक्त व्हावं व आपली मते कळवावीत.
समाजाचं भविष्य हे सर्वस्वी बुद्धीजीवी वर्गावर अवलंबून असतं. तो समाजाला दिशा देणारा वर्ग असतो व उच्च शिक्षण घेतल्याशिवाय समाजात बुद्धीजीवी वर्ग तयार होत नाही. म्हणून आपला विद्यार्थी जर विदेशात जाऊन उच्चशिक्षण घेतला तर समाजात माझ्यासारखे 'बेस्ट ब्रेन' तयार होतील, समाजाचा विकास करतील म्हणून बाबासाहेबांनी तेव्हाचे गवर्नर 'लॉर्ड लिनलिथगो' यांच्याकडून तीन लाख रुपये मंजूर करून घेतले व १९४४ ला १५ विद्यार्थ्यांची तर १९४६ ला १६ विद्यार्थ्यांची बॅच बाबासाहेबांनी लंडनला पाठवली. यालाच 'कोलंबो प्लॅन' म्हणतात. तेव्हाचे तीन लाख रुपये म्हणजे आताच्या तीन कोटीपेक्षांही जास्तच. हिंदूनी 'बनारस हिंदु विद्यापीठासाठी' लॉर्ड लिनलिथगो यांच्याकडून तीन लाख रुपये मंजूर करून घेतली, मुस्लीमांनी 'अलिगढ मुस्लिम विद्यापीठासाठी' तीन लाख रुपये मंजूर करून घेतली.तसेच बाबासाहेबांनीही त्यांच्याकडून तीन लाख रुपये मंजूर करून घेतले.
पुढे त्यानुसार ही विद्यार्थी परदेशात गेली, उच्च शिक्षण घेतलं, मोठी झाली. पुढे ही योजना सी.राजगोपालाचारी यांनी बंदही करून टाकली. परंतु खरा प्रश्न हा नाही, तर ज्या ३१ विद्यार्थ्यांना बाबासाहेबांनी लंडन येथे पाठवले होते त्यांनी खरचं भारतात येऊन समाजासाठी काही केलंय का? हा खरा प्रश्न आहे. त्यातील दोन तीन नावं उदा: एन.जी ऊके, खोब्रागडे, रत्नाकर गायकवाड यांचे वडील सोडले तर बाकीचे लोक कुठे गायब झाली? का बेईमान झाली? यावर समाजाने नव्याने प्रकाश टाकायला हवा. तसेच बाबासाहेबांचा हा 'कोलंबो प्लॅन' काय फक्त त्या ३१ जणांनाच लागू होतो का? तो प्लॅन आजच्या वर्तमानातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना व बुद्धीजीवीनां लागू होत नाही का? खरचं बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं आजच्या अधिकारीवर्गाचं समाजाप्रती वागणं आहे का? का खरचं आजचा अधिकारीवर्ग आत्मकेंद्रित झालाय असं आपल्याला वाटते? याबद्दल आपली मतं काय व याची कारणे काय असावीत यावर मोकळेपणाने व्यक्त व्हा!
-अँड. के.टी.चावरे
उच्च न्यायालय,मुंबई
Leave Comments
Post a Comment