दवाखाने ,हॉस्पिटल बाबत डॉ.बाबासाहेबांचा दूरदृष्टीकोण
Sunday, 4 February 2024
0
दवाखाने ,हॉस्पिटल बाबत डॉ.बाबासाहेबांचा दूरदृष्टीकोण-*
*अनाथालय , मदतकेंद्र व हॉस्पिटल उभारण्याचा मनोदय 1955 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केला होता .*
14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून लाखो लोकांसह बौद्ध धर्माचा स्वीकार नागपूर येथे केला होता .
त्या अगोदर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारण्याची तयारी अनेक वर्षापूर्वीच सुरू केली होती .
त्यासाठी त्यांनी 4 मे 1955 रोजी दी बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नावाची संस्था भारतीय बौद्धा साठी स्थापन केली होती .
त्या संस्थेचे 10 उद्दिष्टे बाबासाहेबांनी निर्धारित केली होती .
*त्यातील 4 थे उद्दिष्ट : भारतात दवाखाने (हॉस्पिटल) , अनाथालये व मदत केंद्रे स्थापन करणे हे आहे.*
यावरून डॉ.बाबासाहेबांचा देशाबद्दल व येथील जनतेबद्दल किती उद्दात्त व थोर दूरदृष्टी कोण होता .हे दिसून येते .
65 वर्षापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय विचार करीत होते .हे यावरून स्पष्ट होते .
आज ही हे उद्दिष्टे व त्यांची गरज भारतात आवश्यक आहे .
*(डॉ.बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग का केला आणि बौद्ध धम्माचा स्वीकार का केला हे सर्व हिंदू बांधवांनी समजून घेण्याची गरज आहे .त्यांना डॉ.बाबासाहेबांची महानता समजायला वेळ लागणार नाही.)*
धर्मभूषण बागुल
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment