महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा युवकांना संदेश.

 *" महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा युवकांना संदेश."* भाग 2.

Dr. Babasaheb ambedkar information in marathi 

तरुण बंधूनी आत एक बाहेर एक असली सवय लागू देऊ नये.सत्य सोडू नका. सत्याचा तात्कालिक जरी विजय होत नसला तरी शेवटी सत्याचाच विजय होतो.आपल्यात दुटप्पीपणा असता कामा नये. जगाला जर हा मनुष्य दुतोंडी आहे असे दिसले तर मग आपल्यावर विश्वास ठेवणार नाही.

आज विद्येची दारे आपणास मोकळी आहेत.आज शिक्षणाच्या ज्या सवलती आहेत त्या आमच्या वेळी मुळीच न्हवत्या. अम्हास त्या वेळी कोणाचीच मदत न्हवती.मला येथील विश्वविद्यालायात असता माझे वडील व कुटुंबातील मंडळी, एक बकरी,सरपण चूल,आठड्याचा बाजार वगैरे सर्व सामान ८×८ च्या लांबी रुंदीच्या खोलीत राहून कॉलेजचा अभ्यास करावा लागत असे. तुमच्या सुदैवाने हि स्थिती आज बदलली आहे. साधनांच्या अभावी शिक्षण घेता येत नाही अशी जर आपण तक्रार केली तर ती निराधार ठरेल.
Dr. Babasaheb ambedkar information in marathi

आपल्यापैकी दरेकाने सुविद्य व्हावे अशी माझी फार इच्छा आहे. परंतु त्याच बरोबर आज विद्येची मला मोठी भीती वाटते. शिकलेल्या माणसांची मला जशी भीती वाटते तशी ती सर्वांनी बाळगली पाहिजे.कारण शिक्षण हि तलवार आहे. शिक्षण हे शस्त्र आहे.जर एखादा मनुष्य तेथे तलवार घेऊन आला तर आपण सर्वजण त्यास घाबरून जाल. परंतु विद्येचे शस्त्र हे नेहमी वापरणार्यावर अवलंबून असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल.चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम परंतु वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशुपेक्षाही क्रूर व भीतीप्रद समजण्यात यावा. अज्ञ जनतेस छक्केपंजे,डावपेच करता येत नाहीत. शिकल्या सवरलेल्यानां ते अवगत असतात.एखाद्याचे व्ह्यू असल्यास तेवढेच ते काढून त्यास कसा पेचात आनावयाचा याकडे बरेच लोक आपल्या शिक्षणाचा उपयोग करतात. दिनदुबळ्या, गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही. त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा शिकले सावरलेले शेठजी, भटजी, वकील वगैरे सर्व लोक घेत आहेत.आहे तर्हेने गरीब जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होत असेल तर धिकार असो अशा या शिक्षणाला. त्या दृष्टीने पाहता शिक्षणा पेक्षा शील फार महत्वाचे आहे.अलीकडील तरुणात धर्माबद्दल औदासिन्य दिसते. धर्म हा गांजा आहे असे ते म्हणतात परंतु माझ्यात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील व माझ्या शिक्षणाचा जो काही जो काही उपयोग झाला असेल तो सर्व माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे, पण धर्माचे ढोंग नको. हिंदू धर्म नरक आहे हि माझी समज आजही कायमच आहे. तेव्हा मला तुम्हाला एवढे सांगावेसे वाटते कि,शिक्षणापेक्षा शिलाला अधिक महत्व द्या. तसेच आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दिनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ न करिता जर शिकून आपली नोकरी भली आहे.आपली बायकामुले भली या भावनेने आजचे शिकलेले तरुण वागणर असेल तर त्याचा समाजाला काय उपयोग?

Dr. Babasaheb ambedkar information in marathi

तरुणांवर आज पडलेली जबाबदारी ओळखून त्यांनी त्या कार्यास लगावयास हवे आहे. जनतेच्या हाडिमासी भित्रेपणा खिळलेला दिसतो. आपले कायदेशीर हक्क बजावण्यास सुद्धा ते धैर्याने पुढे येऊ शकत नाहीत. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरणे,सार्वजनिक राजरस्त्याने मिरावणुकी न्हेणे वगैरे लोक भित्रेपणामुळे करू शकत नाहीत. हि परिस्थिती फक्त तरुणच बदलू शकतील.परंतु त्यासाठी प्रथम कंबर कसली पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्राणयज्ञदल संस्था ठीकठिकाणी स्थापन करावयास हव्या आहेत. निसर्गसिद्ध हक्क मिळविण्यासाठी त्यांनी जोराचे लढे लढविले पाहिजेत.

(12 फेब्रुवारी 1938 रोजी मनमाड येथे अखिल जी.आय.पी.रेल्वे अस्पृश्य कामगार आयोजित युवक परिषदेत केलेले भाषाण)

संदर्भ:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाषणं आणि लिखाण,खंड 18 भाग 2,पान नं-116,17,18.

संकलन:- प्रकाश कदम.
THE REPUBLICAN.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel