✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    डॉ. आंबेडकरांनी ह्या जाणिवेने आपल्या जीवनाच्या अखेरच्या पर्वात मुंबईत 1956 पासून संसदीय शिक्षण देणारी एक आदर्श संस्था "ट्रेनिंग स्कुल फॉर एंट्रान्स टू पॉलिटिक्स" स्थापन ।होती

    "ट्रेनिंग स्कुल फॉर एंट्रान्स टू पॉलिटिक्स"

    भारतीय संविधानाने अंगिकारलेल्या संसदीय प्रणालीतील  केंद्रीय आणि प्रांतीय कायदेमंडळातील प्रतिनिधींचे व्यक्तिमत्व शील आणि प्रज्ञायुक्त असावे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मनोमन इच्छा होती.या संदर्भात 23 नोव्हेंबर 1950 रोजी त्यांनी संसदेत केलेल्या भाषणात आपले विचार व्यक्त केले आहेत.

    उत्कृष्ट संसदपट्टू होण्यास आवश्यक असणाऱ्या गुणांची या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नेतृत्वात निर्मिती होण्याच्या उद्देशाने त्यांनी मुंबई येथे ट्रेनिंग स्कुल फॉर एंट्रान्स टू पॉलिटिक्स सुरु केले.या संस्थेचे संचालक स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शा.श. रेगे हे रजिस्ट्रार होते.यासंबंधीची माहिती खालील प्रमाणे आहे---- संपादक.

    देशातील लोकशाही विचाराला आणि कार्याला परिणामकारक चालना मिळावी त्याचप्रमाणे आपल्या नियोजित रिपब्लिकन पक्षामध्ये तरुणांची भरती होत राहावी या हेतूने राजकारणात प्रत्यक्ष भाग घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी मुंबई येथे एक प्रशिक्षण विद्यालय (ट्रेनिंग स्कुल) सुरु करावे असे डॉ.आंबेडकरांनी ठरविले.ग्रंथपाल शा. श. रेगे यांच्या साहाय्याने ते प्रशिक्षण विद्यालय स्थापन्या संबंधी खटपट करत होते.जे विधिमंडळात कामकाज कामकाज करण्याची महत्वकांक्षा बाळगतात त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या प्रशिक्षण विद्यालयात करावयाची होती.त्या प्रशिक्षण विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या जागेसाठी त्यांना लायक व्यक्ती पाहिजे होती.शिक्षक होऊ इच्छिणारा मनुष्य आपल्या विषयात प्रविण पाहिजे.त्याला उत्तम रीतीने व्याख्यान देता आले पाहिजे.त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक पाहिजे.विद्यालयाचा लौकिक शिक्षकांच्या कर्तृत्वावर आणि वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर बराच अवलंबून असतो.असे त्यांनी रेग्यांना लिहिले.1 जुलै 1956 ते मार्च 1957 पर्यंत रेगे यांच्या देखरेखेखाली ते प्रशिक्षण विद्यालय चालले.त्याचे संस्थापक आणि चालक डॉ.बाबासाहेब यांना त्या विद्यालयाला भेट देण्याचा योग आला नाही हे दुर्दैव.ते प्रशिक्षण विद्यालय त्यांच्या मृत्यूनंतर पोरके होऊन बंद पडले.ते विद्यालय अत्यंत उपयुक्त ठरले असते.राज्यकारभाराला योग्य वळण लावण्यासाठी जाणत्या नी लायक,तज्ज्ञ नी कर्तृत्ववान आमदारांचा नी खासदारांचा विधिमंडळाला नी लोकसभेला पुरवठा झाला असता.

    संसदीय संस्थेमध्ये सभागृहाला आपल्या सौम्य अथवा तीक्ष्ण तर्कशुद्ध आणि माहितीपूर्ण भाषणाने जो सभासद भारून टाकू शकतो तोच सभासद यशस्वी होऊ शकतो.

    संसदीय वक्तृत्वाबद्दल बाबासाहेबांनी काढलेले हे उद्गार त्यांनी आपल्या संसदीय करकीर्दीमधे सार्थ करून दाखवले.कोणत्याही संसदीय संस्थेत निवडून गेलेला प्रतिनिधी हा कार्यक्षम असला पाहिजे.लोकांना जे प्रश्न भेडसावतात ते सोडवण्याचे सामर्थ्य आणि विचारशक्ती ह्याची त्याने प्राप्ती केली पाहिजे.डॉ. आंबेडकरांनी ह्या जाणिवेने आपल्या जीवनाच्या अखेरच्या पर्वात मुंबईत 1956 पासून संसदीय शिक्षण देणारी एक आदर्श संस्था "ट्रेनिंग स्कुल फॉर एंट्रान्स टू पॉलिटिक्स" स्थापन ।होती.त्यात राजकारण,अर्थशास्त्र,अंदाजपत्रक,कामगार संघटना,संसदीय कामकाजा विषयक नियम आणि परंपरा इत्यादी आवश्यक विषयांबरोबर  वक्तृत्वसाधनेला प्राधान्य दिले होते.खुद्द बाबासाहेब या संस्थेचे अध्यक्ष होते.डिसेंबर 1956 मधे वक्तृत्वावर व्याख्याने देण्याचे त्यांनी निश्चित केले होते.दुर्दैवाने त्यांच्या अकस्मात महापरिनिर्वाणाने एका प्रभावी वक्त्याच्या हि संस्था आणि तिचे विद्यार्थी मुकले.

    संदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखाण आणि भाषणं, खंड 20.

    संकलन: प्रकाश कदम.
    THE REPUBLICAN
    25 July 2018.
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: