✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    "शेतकऱ्यांचे हित जपणारे/जाणणारे भारताचे एकमेव नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर."Dr. Babasaheb ambedkar information in marathi

    *"शेतकऱ्यांचे हित जपणारे/जाणणारे भारताचे एकमेव नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर."* small holdings in india and their remedies in marathi
    *======================*

    *जय भिम 🙏💐*

    स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदान येथे महाराष्ट्रातून आलेल्या शेतकाऱ्यांकरिता भरविण्यात आलेल्या जाहीर सभेत

    *"मुंबई सरकार पुढे सादर केलेल्या मागण्या."*

    "मूलभूत मागण्या"

    *१) शेतकरी वर्गाला स्वतंत्रपणे व सुखसमाधानाने राहता यावे म्हणून जमिनीची प्रत्यक्ष मशागत करणाऱ्यालाच त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले पाहिजे.*

    *२) जमिनीची मशागत करून त्यारच जगणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल व त्यांच्या आर्थिक हिताची व्यवस्था व्हायची  असेल तर खोत-इनामदार सारखे मध्यस्थ नसले पाहिजेत.*

    *३) जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यावर कर अगर पट्टी बसविण्यापूर्वी त्याला चरितार्थपूर्ती योग्य ती सोय करून देणे हे सरकारने आपले कर्तव्य मानले पाहिजे.*

    *४) त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना किमान मजुरी देण्याची कायद्याने सोय करून त्यांच्या हिताला जपणे हेही लोकमतवादी सरकारचे कर्तव्य आहे.*
    Dr. Babasaheb ambedkar information in marathi

        *"तातडीच्या मागण्या"*
    ---------------------------------------

    *१) ज्याप्रमाणे थकलेल्या शेतसारा बाक्या माफ करण्यात आल्या त्याचप्रमाणे आजपर्यंत थकलेल्या  खंडाच्या बाक्याहि ताबडतोब माफ करण्यात याव्या.*

    *२) जमिनीचे किमान उत्पन्न ठरवून त्यापेक्षा कमी उत्पन्नावर सारा अजिबात माफ करावा व किमान उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या जमिनीवर वाढत्या मानाने साऱ्याची आकारनी करण्याच्या दृष्टीने जमीन महसूल कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे. त्याचप्रमाणे बाजारभाव उतरले असल्यामुळे हि दुरुस्ती होईपर्यंतच्या मुदतीत ज्यांना सालीना ७५ रुपये अगर त्यापेक्षा कमी शेतसारा द्यावा लागतो त्यांचा सारा ताबडतोब ५०% टक्क्यांनी कमी केला पाहिजे.*

    *३) खोती पद्धती व इनामदार पद्धती या आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक व सामाजिक दृष्ट्या जुल्मी असल्यामुळे या पद्धती भरपाईसह अगर भरपाई शिवाय नष्ट करण्यासाठी कायदा करण्याची व्यवस्था ताबडतोब झाली पाहिजे. ज्याप्रमाणे कुळाकडून खंड वसूल करण्यासाठी व त्यांना छळण्यासाठी जमीनदार जे जे मुदती दाव्यासारखे जुल्मी उपाय योजतील अगर योजण्याचा बेत करतील ते ते ताबडतोब बंद पडले पाहिजेत व सरकारने यासाठी योग्य ती व्यवस्था करावयास पाहिजे.*

    small holdings in india and their remedies in marathi
    *४) (१) तीन वर्षे जमीन कसणाऱ्या कुळाला कायम कुळ समजले जावे,असा कायदा सर्व जमीनदाराच्या कुळांना लागू केला पाहिजे. या कायद्याला बगल देण्याची कारवाई जमीनदारांना करता येऊ नये म्हणून एक लँड कमिशन नेमण्यात यावे व या कमिशनच्या परवानगीखेरीज कुळाच्या अंगाखालील जमीन काढून घेतली जाता कामा नये. कुळ जोपर्यंत खंड देत आहे तोपर्यंत त्याजकडे तीन वर्ष असलेली जमीन कोणत्याही सबबीवर काढून घेतली जाता कामा नये.*

    *४) (२) साऱ्याच्या मानाने फक्त तिसरा हिस्सा अधिक खंड घ्यावा.जास्त खंड कुळाकडून घेता येऊ नये.*

    *५) लहान शेतकऱ्यांची पाणीपट्टी ५०% टक्क्यांनी कमी केली पाहिजे. बहुसंख्य लहान-लहान शेतकरी व कुळे यांना फायदेशीर होईल असे धोरण इरिगेशन खात्याने चालविण्याच्या दृष्टीने इरिगेशन, इरिगेशन कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे.*

    *६) सर्व खेड्याना मोफत चराई राने असावीत.*

    *७) कर्ज निवरण्याचा योग्य तो कायदा सर्वत्र लागू होईपर्यंत कर्ज तहकुबी जाहीर करावी.*

    *८) शेतकऱ्यांच्या हातून सावकारांच्या हाती जमीन जाऊ या दृष्टीने सावकारकीवर बंधने घालावी.*

    *९) शेतकऱ्यांच्या निर्वाहासाठी लागणारी किमान जमीन व त्याच्या चरितार्थाला लागणाऱ्या वस्तूंवर सावकारी जप्ती आणण्यास बंदी झाली पाहिजे.*

    *१०) वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषास मताधिकार.*

    *११) वेठ-बिगार करून घेणे व बेकायदेशीर रीतीने पैसे उकळणे हे फौजदारी गुन्हे ठरविले पाहिजे.*

    *१२) जमीन महसूल खात्यातील सर्व मॅजीस्ट्रेटि अधिकार काढून घ्यावेत.*

    *१३) कसता येण्याजोगी सर्व पडीत जमीन उपरी शेतमजुरांना मोफत वाटून द्यावी.*

    *(१० जानेवारी १९३८,मुंबई)*

    *संदर्भ:-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाषणं आणि लिखाण खंड १८ भाग २ पान नं- ७६,७७.*

    *जय भिम 🙏💐*
          *जय बुद्ध 🙏💐*
              *जय रिपब्लिक इंडिया 🇮🇳*

     *संकलन:-  प्रकाश कदम.*
    *THE REPUBLICAN*
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: