🌼"धम्माचा उद्देश जगाची पुनर्रचना करणे"🌸

*"धम्माचा उद्देश जगाची पुनर्रचना करणे"*

*जागतिक क्रांतीतत्त्वज्ञ डॉ बाबासाहेब हे आवर्जून मांडणी करतात, पुनर्रचना म्हणजे आमूलाग्र बद्दल अर्थात जग बदलायचं असेल तर वर्णनाकडून वर्तनाकडे जावं लागेल पुढे जग कसं असेल हे पुन्हा पुन्हा वर्णन करून म्हणून आपले जे समकालीन प्रश्न आहेत त्यांची उत्तरे कोणाच्या दरबारात आपणाला मिळणार आहेत हे गेल्या वीस वर्षांपासून जे नवीन जग आले आहे त्याला आपण जागतिकीकरण म्हणतो खाजगीकरण, म्हणतो कॅशलेस म्हणतो, उदारीकरण म्हणतो कॉपीराईट म्हणतो, अजून काही म्हणतो ऑन लाईन म्हणतो मुद्दा असा आहे की समकालीन प्रश्नांची उकल करण्यासाठी वेळोवेळी परिणाम वापरावे लागतात आणि आपल्या दृष्टीने सगळ्यात मोठ सगळ्यात परिणामकारी जो परिणाम आहे तो म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे."एखादा पक्ष किती वयाचा आहे हा प्रश्न महत्त्वाचा नाही तर त्याची तत्वे काय आहेत, तो काय साध्य करू इच्छितो आणि त्याची सुप्त शक्ती काय आहे. या बाबीच महत्त्वाच्या आहेत."कामगारांचे ध्येय स्वातंत्र्य, समता व बंधूभाव या तत्त्वांवर आधारले असले पाहिजे "वंश आणि धर्मामुळे एक कामगार दुसऱ्याचा शत्रू बनत असल्यामुळे कामगारांच्या ऐक्यामध्ये आड येणारी ही कारणे नष्ट करणे हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग होय" भांडवलशाहीविरुद्ध जोरजोराने भाषण देताना  कामगार पुढाऱ्यांना मी ऐकले आहे. परंतु कामगारांमध्ये असलेल्या ब्राह्मणशाहीविरुद्ध बोलताना मी कोणत्याही कामगार पुढाऱ्याला ऐकलेले नाही या उलट या मुद्द्यावरील त्यांचे मौन स्पष्टपणे दिसून येत आहे.

ब्राह्मणशाहीवर श्रद्धा असल्यामुळे व कामगारांच्या ऐक्याशी त्यांचे काही कर्तव्य असो की नसो ब्राह्मणशाहीचा कामगारांच्या बेकीशी काही संबंध आहे असे त्यांना वाटत नसल्यामुळे त्यांचे हे मौन असो की नसो किंवा केवळ कामगारांचे पुढारीपण मिळविण्याची हौस असल्यामुळे कामगारांच्या भावना दुखविल्या जाऊ नये म्हणून त्यांचे हे मौन असो की नसो याची चौकसी करण्यासाठी मी खोळंबून राहात नाही" मनमाडच्या कामगार परिषदेत बाबासाहेब हे स्पष्ट सांगितले आहे याचा प्रत्याय आजही येत आहे आज सत्ता ब्राह्मणशाहीच्या हाती आहे म्हणून इतिहासाची उजळणी आवश्यक आहेच कारण पुष्यमित्र शुंगाच्या काळी धम्माचे वाटोळे झाले हा इतिहास आहे. भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही या दोघांनीही आज घट मैत्री केलेली आहे 1938 सालीच बाबासाहेब लोकशाहीचे खरे शत्रू हे दोनच आहेत असे सांगून पुढील पिढीला उजेड दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा विचार घेऊनच समकालीन पुढे चाललं पाहिजे शेतकरी आत्महत्या का ? करतात बाबासाहेबांच्या विचारात उत्तर सापडेल का? ही महागाई का वाढते, लोकसंख्या नियंत्रण, रस्ते, बाबासाहेबांच्या विचारात राजकारणाच्या चिंधड्या चिंधड्या का होतात त्यांचा सांधा जोडायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचारात उत्तर सापडेल का ? देशातील पाणी वीज प्रश्नःनवर बाबासाहेबांच्या विचारात उत्तर सापडेल का ? हे जे सर्व शेजारचे राष्ट्र स्वस्थ झाले आहेत भारत हा जगातील सर्वात एकमेव शाब्दिक देश असूनही त्याच्या बाजूला एकही देश नाही जी भारताची सीमा आहे त्याचं वर्णन अतिशय चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांनी थॉट्स अन पाकिस्तान या पुस्तकात केलं आहे. दोन देशातल्या या प्रश्न आहे म्हणून या नव्या पिढीला याची उत्तरे शोधण्या आपणाला बाबासाहेबांच्या विचाराकडेच जावं लागेल किंबहुना तिला जावच लागणार आहे. बाबासाहेबांनी कोठयावादी लोकांना धर्मातुन मुक्त केले. त्यांनी धम्म दिला, अर्थात विचार दिला. धर्म आणि धम्म या दोन संकल्पनांमधील केवळ भेदच सांगितला नाही तर विरोधही स्पष्ट केला. त्यांनी धर्मांची मीमांसा केली. धम्मात विशेष म्हणजे प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. सम्यक समाधी आणि ध्यान धारणावाल्यांची समाधी या दोन पूर्णता भिन्न गोष्टी आहेत. सम्यक समाधी म्हणजे मनाची फक्त एकाग्रता. बुद्धांनी शोधून काढलेला मार्ग हा स्वप्रयत्नाने, स्वकष्टाने व स्वध्यायनाने तयार केलेला आहे कुणा दुसऱ्याच्या पूंजीवर बुद्धाचा धम्म आधारलेला नाही. जगात जोवर न्याय मिळत नाही तोवर शांतता नाही याचाच अर्थ बाबासाहेबांनी सन्मान आणि स्वाभिमानाने जगायला शिकविले. अवघ्या समाजाला माणूसकीचा आणि समतेचा विचार दिला...*

- संदीप महाडीक ( क्रांतीभूमी ) 9222437849
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel