✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    औरंगाबाद येथे उभारणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णकृती पुतळा;!


    भारतरत्न बोधिसत्व परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पूतळा डॉ आंबेडकर नगर चौक, सिडको एन-7
    औरंगाबाद येथे मंजूर करण्यात आला आहे.

     यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समिति आंबेडकर नगर  १,यशोधन गवई २,सुमित मगरे ३,किरण खरात ४,सतिश नावगिरे ५,प्रवीण जगताप६, मिलिंद दाभाडे ७, गजानन बिरसाने ८,महेश मस्के ९, संदीप मकळे १०,राजेश भरसाकळे ११,संतोष चव्हाण १२, विलास फतपुरे १३,राजेश मोकळे १४,नागेश साळवे आणि इतर सर्व भीमसैनिक यांच्या प्रयत्नांना यश.

    औरंगाबाद येथे दोन मुख्य राज्यमार्ग आहे एक जालना औरंगाबाद मार्ग आहे,तेथे छञपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आहे, आणि आता जळगांव औरंगाबाद राज्यमार्ग आंबेडकर नगर येथील आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मागणी मान्य झाली आहे, आंबेडकर नगर आणि जवळील वार्डातील तरुण तडफदार युवक कार्यकर्ते या कामी कायम माझ्या संपर्कात होते, त्यांना वेळो वेळी मार्गदर्शन आणि मदत केली आणि त्यांनी स्थानिक पातळी पासून ते वरिष्ठ पातळीवर आवश्यक पत्रव्यवहार करून पुतळ्याची मागणी लावून धरली, आणि त्यांना त्यात पाहिले यश ही आले आहे. या कामी मनपात ठराव पास करून घेण्यात नगरसेवक अनिल जैसवाल, मनोज बल्लाळ,जोती पिंजरकर यांनी भूमिका पार पाडली तसेच मा.भाई विजयराव  साळवे शहर अध्यक्ष रा.काँग्रेसआणि उद्धव बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस श.उपाध्यक्ष यांनी ही मदत केली.

    विशेष म्हणजे या सर्व तरुण मित्रांनी स्वखर्चाने डॉ बाबासाहेब आंबेडक यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा ही तयार करून ठेवला आहे, आणि बेसिक फाउंडेशन ही तयार करून ठेवले आहे, तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून चहू बाजूने सी सी टी व्ही कॅमेरे ही लावण्याची त्यांनी व्यवस्था केली आहे.
    त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळून राज्य महामार्गवार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसून गेल्या चाळीस वर्षाची मागणी पूर्ण होईल.

    त्यांच्या या लढ्यात कायम त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सोबत आहे.

    जय भिम
    सतीश पट्टेकर
    पँथर सेना संघटना प्रमुख
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: