✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 मे 1950 ला वयक्तिक धम्मदीक्षा घेतली होती जाणून घ्या कारण

    #आधुनिक #बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 2 में 1950 ला आपली पत्नी डॉ ‌. माईसाहेब आंबेडकर सोबत दिल्लीच्या महाबोधी बौद्ध विहारात बौद्ध धम्माचा स्विकार केला होता. ही बातमी  The Bharat च्या 3 में 1950 च्या अंकात प्रकाशित झाली होती आणि महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या #डॉ. #बाबासाहेब #आंबेडकर #लेखन #आणि #भाषणे #खंड #क्र 17 #भाग 3 मध्ये पृ. 402 #ही #बातमी #दिली #आहे. 2 में 1950 ला सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपली पत्नी सोबत दिल्लीच्या बौद्ध विहारात गेले. तेथे त्यांनी त्रिशरण आणि पंचशिल ग्रहण केले. प्रा. अरूण कांबळे यांनी ' धर्मांतराची भीम गर्जना ' या पुस्तकात पृ. 56 वर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदिक्षा घेतलेल्या भिक्खूचे नाव आर्यवंस यांनी सांगितले नमूद केले आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार 1950  मध्ये जागतिक बौद्ध धर्म परिषदेसाठी कोलंबोकडे जाण्याच्या अगोदर केला होता. माईसाहेब आंबेडकर यांना 19 सप्टेंबर 1954 शिष्यवृत्ती बचाव परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते.
    (डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा 2 मे 1950)

     त्यावेळी त्यांच्या तीन चार दिवस नागपूरला मुक्काम होता. या दरम्यान त्याच्याशी डॉ. आंबेडकरांच्या वैयक्तिक जीवनाबाबत चर्चा केली होती. तसेच नागपूर दूरदर्शनकरिता मुलाखत घेतली होती. तेव्हा चर्चेदरम्यान 1950 मध्येच डॉ‌  बाबासाहेब आंबेडकरांनीआणि #मि #वैयक्तिकरित्या #बौद्ध #धम्माची #दिक्षा #घेतली #होती असे सांगितले होते. येथे वैयक्तिक या शब्द महत्त्वाचा आहे. हे लक्षात घ्या मुंबई येथील बौद्ध धर्म सल्लागार समितीतर्फे दिनांक 14 जानेवारी 1955 रोजी वरळी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. या संभेला 50 हजार पेक्षा जास्त समुदाय हजर होता. या भाषण करताना डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की , " #बौद्ध #धर्म #मी #स्वीकारला #आहे. तुम्हीही स्वीकारा.नुसत्या अस्पृश्य समाजानेच  तो स्वीकारून चालणार नाही तर साऱ्या भारताने व त्या बरोबर साऱ्या जगाने ही बौद्ध धर्म स्वीकारावा अशी माझी इच्छा आहे."
    विकास शिंदे
    The Republican

    पुढील लेखा मध्ये सार्वजनिक दीक्षा का दिली यांबद्दल अजून विस्तारीत माहिती मिळेल.. 
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: