✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    कोपर्डी दलित हत्याकांड : ट्रॅक्टर चोरीचा खोटा आळ घेऊन समाधान शिंदे या बौद्ध तरुणाची हत्या

     कोपर्डी दलित हत्याकांड : ट्रॅक्टर चोरीचा खोटा आळ घेऊन समाधान शिंदे या बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आली आहे. कर्जतचा अंबालिका  कारखाना येते ट्रॅक्टर वर समाधान वाहतुकीचे काम करत होता. ट्रॅक्टर मालक हे कोपर्डीचे व समाधान शिंदे हा ही कोपर्डीचाच होता. ट्रॅक्टर कारखाण्याच्या आवारातून गायब झालं. हे ट्रॅक्टर तूच चोरी केलं म्हणत समाधानचा अतोनात छळ करण्यात आला. आरोपी हे समाधानला पोलिसांकडे घेऊन गेले पोलीस काळे व म्हत्रे यांनी समाधान शिंदेला मारहाण केली. या सगळ्यांनी त्याला धमकवल एवढंच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घे कुठंय ट्रॅक्टर सांग म्हणत मारहाण केली.


    इमानदारीने नौकरी करणाऱ्या समाधानवर शँका, संशय, मारहाण, मानसिक छळ, धमकवण्यात आलं. त्यामुळे समाधान शिंदे घाबरला होता त्याने हा सगळा प्रकार घरी सांगितला. परत मालकाचा फोन आला की ये नवीन ट्रॅक्टरवर पुन्हा काम सुरू कर. समाधान शिंदे निघाला तेवढ्यात त्याचाच कॉल आला की तुला काही पोरं मारहाण करणार आहेत. 

    काही वेळेने समाधान कारखान्याच्या जवळच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शिंदेच्या भावाने सांगितले बाकी, समाधानच्या अंगावर जखमा होत्या, ओळ होते, त्याची हत्याच केलेली आहे. समाधानची आई म्हणते की, समाधानला 10 ते 12 लोकांनी मारहाण केलेली आहे. 

    पीडित कुटुंब मोठ्या दबावाखाली आहे, एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांनी विलंब लावला, आरोपीना अटक होत नाही म्हणून कुटुंबांनी 4 दिवस घरीच उपोषण केलं, तेंव्हा कुठं पोलिसांनी 1 आरोपी अटक केला.

    अंबालिका कारखाना अजित पवारांचा, कोपर्डी कर्जत मतदार संघाचा आमदार रोहित पवार, कोपर्डी सर्कलचा जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि तिन्ही आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यामुळे पोलीस यंत्रणा मोठ्या दडपणाखाली दिसते, दबावाखाली दिसते. समाधान शिंदेच्या हत्या दाबायला निघालेले आहेत. पीडितांना या यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही.

    पीडितांना मोठ्या आशेने नवनेते असलेले आमदार रोहित पवार यांना कॉल केला परिस्तिथी सांगितली आमदाराने उडवाउडवीचे उत्तरे दिली. घटनाहून 20 दिवस झाली आमदार तिकडं फिरकले नाही. कर्जत मतदारसंघात दलितांची किड्या मुंग्यांसारखी अवस्था झालेली आहे. दलितांना रंगडलं जात आहे. रोहित पवार यांच्या मतदार संघात पोलिसांना हाताशी धरून जातीय गुंडांच्या मार्फत दलितांचे हत्याकांड होत आहेत. सत्ता आमची आहे या अविर्भावात जातीय गुंड दलितांना उद्धवस्त केला जात आहे. या व्यवस्थेकडे मानवता उरलेली नाही, संवेदना उरलेल्या नाहीत. असा दलीतविरोधी व्यवस्थेचा धिक्कार असो!

    समाधान शिंदेचं कुटुंब उघड्यावर पडलं आहे, 31 वर्षाचा हा तरुण एक मुलगी चौथीला आहे तर एक मुलगा दुसरीला आहे. घरात कमवता असलेला समाधान जातीयतेचा बळी गेलेला आहे.

    पीडित म्हणतायत आम्ही पोलिसांना म्हणतोय की, आमच्या मुलाची हत्या झाली, पोलीस म्हणत्यात की नाही त्याने फाशी घेतली. पीडितांचा नीट जबाब सुद्धा घेतला जात नाही. ही मुस्कटदाबी या महाराष्ट्रात दलितांची सुरू आहे याचा जाहीर निषेध!

    ऑल इंडिया पँथर सेना मागणी करते की, नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणुन घोषित करा. आरोपींवर 302 अंतर्गत कार्यवाही करा. सर्व आरोपींना तात्काळ अटक करा. आरोपी सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे तात्काळ प्रकरण सीबीआय कडे सोपवावे. ट्रॅक्टर कुणी चोरीला गेलं ते कसं सापडलं ते कुणी चोरलं होत याचा शोध लावावा, ट्रॅक्टर चोरीचं ढोंग करून समाधान शिंदेच्या हत्येचा कट शिजत होता का याचा सखोल तपास झाला पाहिजे.

    नगर जिल्ह्याकडे ऑल इंडिया पँथर सेना मोठ्या ताकदीने आंदोलन उभा करणार असून येणाऱ्या काळात हे चळवळीचं केंद्र केलं जाईल. या भागातील तरुणांनी दलितांच्या नायनाटचा सुरू असलेला खेळ उद्धवस्त करावा!

    आज पीडितांना भेट दिली आई वडील रडत होते. न्याय द्या म्हणत होते, एसपी, डीवायएसपी यांना निवेदन देऊन विविध मागण्याचं निवेदन देण्यात आलं. 

    #JusticeForSamadhanShinde

    #JusticeForKopardiDalitHtyakand 

    #AjitPawarHoshMainAao

    #RohitPawarHoshMainAao


    #AllindiaPantherSena

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: