✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    डॉ. आंबेडकर जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा, गर्दी नकोच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधेपणाने कार्यक्रम करण्याचं आवाहन केलंय. जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केले जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.ते आंबेडकर जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बैठकीत बोलत होते.

    जयंती समन्वय समितीच्यावतीने 14 एप्रिल या जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी न करता अभिवादन केले जाईल. राज्यभरातील अनुयायांनाही जयंती साजरी करण्याच्या शासन परिपत्रकातील नियमावलींचे पालन करून साधेपणाने जयंती साजरे करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

    सौ. Tv 9 मराठी..

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: