✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    आजही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांना दिलेल्या हक्कांची जाणीव होते.


    व्हाइसरॉय च्या समितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांची वर्णी लागताच त्यांना भारताचे मंजूर मंत्री कारभार देण्यात आला. हा त्यांचा कार्यकाळ १९४२ ते ४६ पर्यंत होता.

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या हृदयात बुद्धांची करुणा वसत होती. त्यामूळे त्यांना मजूरांची परिस्थिती कशी असते त्यांची दुःखे काय आहेत यांची जाणीव होतीच. त्यांचं बालपण आणि तारुण्य हे अशा कष्टकरी कामगार लोकांच्या वस्तीतच गेलं होतं. म्हणून त्यांनी आपली पहिली राजकीय चळवळ सुरू करताना पक्ष म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष या नावाने सुरूवात केली होती.


    तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जसा मजूर मंत्री म्हणून कारभार हाती घेतला तसा त्यांनी कामगारांची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी समाजकल्याणकरी कायदे बनविण्याचा प्रारंभ केला. जवळपास ४० कामगार कायदे लागू केले.(आज कामगारांची आणि त्यांच्या कायद्याची काय अवस्था आहे हे मायबाप सरकार जाणो आणि आत्ताचे कामगार नेते)

    कामगारांच्या कामांचे तास निश्चित केले.

    कामगार विमा योजना लागू केली.

    कामगारांसाठी नुकसानभरपाई विधेयक सुरू केले.

    कायद्याने पगाराची रक्कम मिळेल याची खात्री करून दिली.

    स्त्री कामगारांना प्रस्तूतीच्या काळात विशेष रजा मंजूर करून दिली.


    खाण कामगारांना बरेच संरक्षण कायदे निर्माण केले.


    औद्योगिक व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात सुसंवाद निर्माण व्हावा म्हणून  केंद्र सरकारच्या माध्यमातून Chief Labour Commissioner या पदाची निर्मिती केली.

    सर्व उद्योग आणि कारखान्यात काम करणाऱ्या मजूरांच्या आरोग्यासाठी संपूर्ण भारतात लेबर अधिकाऱ्यांची नेमणूक केली.


    भारताचे पहिले चिफ लेबर कमिशनर म्हणून त्यांनी श्री. एस्. सी. जोशी यांची नेमणूक केली.  हे सद्गृहस्थ त्याकाळी FSC (Federal Service Commission)  मधील कॅडर नव्हते. (आजचे IAS अधिकारी). पण त्यांचा कामगार क्षेत्रातील अनुभव खुप दांडगा होता. या अनुभवाच्या आधारावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जोशी यांची निवड केली होती. या नेमणूकीला व्हाइसरॉय यांनी आक्षेप घेतला तेव्हा उत्तर देताना बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाइसरॉय यांना असे म्हटले की, मला कामगारांचे हित जपणारा माणूस हवा आहे. ज्यात जोशी हे उत्तम आहेत. जर माझ्या नामांकनावर आक्षेप घेतला तर मी राजीनामा देऊन बाहेर पडतो. नंतर व्हाइसरॉय यांनी जोशी यांच्या नेमणूकीला मान्यता दिली.

    --------------------------------------------------------------------------

    डॉ बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम पारख असलेले नेते होते. त्यांनी जातीचा माणूस म्हणून कुणालाही नेमणूक करता आली असती. पण ते जातीवादी नव्हते.


    धनबाद येथील खाण कामगारांना त्यांच्या वस्तीत जाऊन भेट घेतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर.

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: