✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर

    अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर

    *"प्राध्यापक केन्स यांनी वैज्ञानिक  आधारावर काही बाबी तपासण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ,त्यांनी काढलेला निष्कर्ष आणि माझ्या निष्कर्षात खूपच विरोधाभास आहे. विनिमय प्रमाणाविषयी त्यांनी काढलेल्या प्रत्येक विधानाबाबत आमच्यात मतभेद आहेत.हे मतभेद मूलभूत बाबींपासून सुरू होतात.ज्या प्रा.केन्स यांनी दुर्लक्षित केल्या आहेत. जोपर्यंत आपण रुपयाची खरेदी क्षमता स्थिर करत नाही तोपर्यंत रुपयाचे मूल्य स्थर होऊ शकत नाही .जे विनिमय प्रमाण साध्य करू शकत नाही.प्रमाणाबाबत बोलायचे तर तो फक्त रोगाची लक्षणे दाखवतो,रोग नाही. तरीही माझ्या दृष्टीनं काहीही असलं तरी तो रोग वाढवू शकतो.भारतीय चलनाविषयी माझी मतं इतर लेखकांपेक्षा फारच भिन्न आहेत.ती मांडत असतानां ती कदाचित अतिस्पष्टीकरणात्मक वाटतील.पण मी सांगेल की माझं लिखाण हे भारतीय जनतेच्या भल्यासाठीच आहे.लोकांची या विषयावरील आकलनशक्ती जरा कमी असल्यामुळे अतिस्पष्टीकरणही एका प्रकारे कमी सांगण्यापेक्षा चांगलेच आहे" 

                                                               
      डॉ.बासाहेब अंबेडकर*                                                   संदर्भ-  रुपयाचा प्रश्न                                                                                                         
       *स्वदेशी चा बाऊ न करता जगाशी व्यापार करा.*       

         "स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल असे सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थतज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की,परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किंमतीत मिळतो. तसा माल स्वदेशात उत्पन्न होत नाही.त्याचा टिकाव लागावा म्हणून अटकाव करावा ,या महामंत्राचा जप चालवला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांना अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी ? असे केल्याने देशाचे कल्याण होईल असे म्हणण्या ऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल .कारण अनियंत्रित व्यापार पध्दतीत मिळत असलेल्या स्वस्त भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबानां अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहेत.यात त्यांची होणारी नागवण "स्वदेशी " या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभाव्य नाही." सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल"                              *                       
       डाँ.बाबासाहेब अंबेडकर .   
    संदर्भ - बहिष्कृत भारत १३ मे १९२९.       
    संकलन - मनीषा कांबळे
    The Republican 
    (Reconstruction Republican party of india,)💐            
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: