✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचणारे महाकवी



    *महाकवी वामनदादांचा स्मृतीदिन*

    *त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन ! व कोटी कोटी प्रणाम !!*

    *भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते*
    *तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते*

    *वाणीत भीम आहे, करणीत भीम असता*
    *वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते*

    *गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे*
    *खोटे इथे खऱ्‍याचे दुसरेच टोक असते*.

    *तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते*
    *सारे चलन तयांचे ते रोखठोक असते*.

    *सदभाव एकतेचे जर अंतरात असते*
    *चुकले कुणीही नसते सारेच एक असते*.

    *वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते*
    *तुझिया कृतीप्रमाणे सारेच नेक असते*.

    चांदण्याची छाया कापराची काया
    माऊलीची माया होता माझा भीमराया....

    चोचीतला चारा देत होता सारा
    आईचा उबारा देत होता सारा
    भीमाईपरी चिल्यापिल्यावरी
    पंख पांघराया होता माझा भीमराया....

    बोलतात सारे विकासाची भाषा;
    लोपली निराशा आता...लोपली निराशा ;
    सात कोटीमधी विकासाच्या आधी
    विकासाचा पाया होता माझा भीमराया....

    झाले नवे नेते मलाईचे धनी ;
    वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी;
    झुंज दिली खरी रामकुंडावरी;
    दगडगोटे खाया होता माझा भीमराया..... 


    तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचणारे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीदिनी
    ..विनम्र अभिवादन..💐💐💐💐

    Amol & Amol  FB WALL
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: