✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    बुद्ध जयंती का साजरी केली जाते?

    🤔 *बुद्ध जयंती का साजरी केली जाते?*


    बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण अर्थात बुद्ध जयंती ज्याला बुद्ध पौर्णिमा देखील म्हटले जाते. भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

    हा दिवस तीन कारणांसाठी विशेष आहे. ते म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते.

    जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

    🧐 *बुद्ध जयंतीचा इतिहास* : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/ प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली

    बुद्ध पौर्णिमा भारतासह श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, नेपाळ, थायलंड, मलेशिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांत साजरी केली जाते. श्रीलंकेत बुद्ध पौर्णिमेला ‘वेसाक’ असे  म्हणतात. हा वैशाखचा अपभ्रंश आहे.

    ▪ या दिवशी बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घर सजवले जाते.
    ▪ बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते.
    ▪ बुद्ध विहारांमध्ये (बौद्ध मंदिरांमध्ये) आणि घरांमध्ये अगरबत्त्या लावल्या जातात. बुद्ध मूर्तीवर फळ-फूल चढवले जाते आणि दिवा लावून पूजा केली जाते.
    ▪ बोधिवृक्षाची पूजा केली जाते. त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात. मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते. वृक्षाच्या भोवती दिवे लावतात.
    ▪ या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो.
    ▪ पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करुन खुल्या आकाशात सोडले जाते.
    ▪ गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते.
    ▪ बौद्ध अनुयायींना प्रार्थना करता यावी यासाठी दिल्ली येथील बौद्ध संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी बाहेर काढून ठेवल्या जातात.
    बुद्ध जयंती निमित्ताने हा व्हाट्स अँप स्टेटस जरूर ठेवावा..

    📍 बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प केला जातो.

    🙏 *बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा* : https://ltsup.in/2WQtZN9

    🌐 *इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा* : https://goo.gl/uP9uqZ
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: