✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    प्रसिद्ध वाचाळवीर :- बुद्धराज अर्जुनराव गवळी

    प्रसिद्ध वाचाळवीर :-

    प्रसिद्धी हळूहळू खरुजा सारखी वाढत चालली
    साहित्याच्या झाडावर ही जाती जातीची बांडगुळ वाढली
    जो तो स्वतःला ठेकेदार समजू लागला
    मनातली जळफळाट बाहेर पडू लागली.....

    कवितेच्या राजवाड्यात हल्ली
    टोळ्यांची टोळी झाली
    तो गटातील नाही म्हणून
    त्याला टाळी नाही आली
    तर काही दीड शहाणे प्रसिद्धीची
    हवा गांडीत घेऊन फिरू लागले
    मलाच सारं कळतं सारं येतं समजून
    दुसऱ्यांना कमी लेखू लागले
    त्याची ही टाळी दुसऱ्यासाठी वाजत नाही
    त्याला वाटतं मीच बाकी कुणी नाही.....

    अरे खरकट्या ताटात खाणाऱ्यांनो
    अन चड्डीला हात पुसणाऱ्यांनो
    कविता ही काय तुमची रांड आहे का ?
    का तुमच्या बापाने दिलेली वारस हक्क आहे ?
    चेहरे बघून टाळी वाजवणारे
    स्वतःला श्रेष्ठ समजणारे
    कवितेला टाळी द्या
    कवी मापात आणू नका
    कविता जगा.....

    कुणी काय लिहावं कुणी काय लिहू नये
    हा ज्याचा त्याचा अधिकार
    मग का करायचा कुणाच्या कवितेचा धिक्कार
    नामदेव सारखं लिहिण्यासाठी
    अगोदर नामदेवा सारखं जगावं लागतं
    विद्रोही कविता लिहून स्वतःला
    विद्रोही म्हणवणाऱ्यांनो
    नामदेवा सारखं रस्त्यावर चळवळीसाठी
    अगोदर उतरावं लागतं....

    विद्रोही कविता अशीच लिहली जात नाही
    ज्यांन अत्याचार अन्याय सोसालाय
    भोगलाय
    ज्याच्या पिढ्या व्यवस्थेला बळी पडल्या
    जो चळवळीसाठी रस्त्यावर उतरला
    ज्याने एल्गार विद्रोहाचा पुकारला
    ज्याने सोडा बॉटल अन लाठ्या खाल्ल्या
    तोच समर्थपणे व्यापक अन जिवंत
    विद्रोह लिहितो....

    आयत्या पिठावर रेखोट्या मारणाऱ्यानी
    अन कधी ही अन्याय न भोगणाऱ्यांनी
    आपलीच कवी म्हणून लाल करणाऱ्यांनी
    साहित्यात भेदभाव जे पाळतात
    असल्या झाटूंनी
    आम्हाला विद्रोहाची भाषा शिकवू नये......

    *बुद्धराज अर्जुनराव गवळी ( राजन गवळी )*
    *कल्याण जिल्हा ठाणे*
    *१९/०६/२०१९*
    *८९२८८५२४७६*
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: