✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    ✍ लोकशाहीचा आधारस्तंभ : राजर्षी शाहू महाराज !!

    ✍ लोकशाहीचा आधारस्तंभ : राजर्षी शाहू महाराज !!
           
    भारतात अनेक राजे - महाराजे होऊन गेले. भारतातील राजेशाही म्हणजे एकाधिकारशाही, हुकूमशाही व घराणेशाही संपली आणि लोकशाही आली. या लोकशाही व्यवस्थेत एखाद्या राजाचे स्मरण होणे दुरापास्त आहे. कारण राजेशाही आणि लोकशाही हे दोन परस्पर विरोधी टोक आहेत.

    कोल्हापूर संस्थानचे राजा छत्रपती शाहू महाराज यांचे स्मरण मात्र लोकशाहीचा व्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून करण्यात आणि आरक्षणाचे जनक म्हणुन करण्यात येतो.

    राजर्षी शाहू महाराज हे राजा असूनही ऐष आरामात जीवन न घालविता सर्व सामान्य गोर गरीब दलित शोषित उपेक्षीत जनतेसाठी त्यांनी आपले जीवन झिजविले आहे.

     *२६ जून १८७४* रोजी शाहू महाराजांचा जन्म झाला. त्यांचे नाव यशवंत असे होते. कर्नाटक मधील मुधोळ येथील राजाची मुलगी राधाबाई आणि अप्पासाहेब घाटगे यांचा ज्येष्ठ मुलगा यशवंतराव अप्पासाहेब घाटगे म्हणजेच राजर्षी शाहू महाराज !
             
    छ. शिवाजी महाराज यांचे वारस चौथे शिवाजी राजे यांची विधवा पत्नी आनंदीबाई यांनी आपल्या गादीला वारस म्हणून यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले.

    मार्च १८८४ मध्ये हा दत्तक विधान पार पडला. त्यावेळी यशवंतचे वय अवघे दहा वर्ष होते. तेथून आणखी पुढची दहा वर्ष त्यांनी विविध ठिकाणी उच्च दर्जाचे शिक्षण घेतले.

    प्रत्यक्ष राज्य कारभार त्यांनी सन 1894 मध्ये आपल्या हातात घेतला.

    कोल्हापूर नगरीत उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी सर्व प्रथम राजाराम कॉलेजची ईमारत बांधली व तेथे भव्य कॉलेज सुरू केले.
               
    शिक्षणाशिवाय कुणाचाही उद्धार होणार नाही खूणगाठ मनाशी बांधून शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षण आणि रोजगार यावर भर दिला. गोरगरिबांना सहज परवडेल असे स्वस्त तसेच मोफत शिक्षणाची सोय केली. गरीब विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृहे सुरू करण्यात आली.

    जाती व्यवस्थेमुळे विविध जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र राहू शकत नव्हते म्हणून प्रत्येकाची वेगळी वसतिगृहे स्थापन करण्यात आली.

    शिक्षणाशिवाय जातीयतेचे सोस कमी होणार नाहीत म्हणून महाराजांनी आपला जास्तीत जास्त भर शिक्षणावर दिला.
           
    शिक्षण पूर्ण झाल्यावर या विद्यार्थ्यांना रोजगार कोल्हापूर संस्थानातच मिळाला पाहिजे व ज्या योगे त्याच्या व कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची सोय झाली पाहिजे, अशी काळजी शाहू महाराज घ्यायचे. या रोजगार व नोकरीमुळे बहुजन समाज चांगले जीवन जगू लागला. कांही लोकांना हे आवडत नव्हते. यामुळे त्यांची मक्तेदारी धोक्यात येते की काय अशी भीती त्यांना वाटत होती, म्हणून ते शाहू महाराजांना कधी छुपा तर कधी उघड विरोध करू लागले. यांचे नेतृत्व पुण्यातून बाळ गंगाधर टिळक हे करीत होते.

    केसरी या वर्तमान पत्रातून शाहू महाराज यांचेवर रोज टीकेची झोड उठत होती परंतु त्याची पर्वा न करता जन कल्याणाचे कार्य त्यांनी आणखी जोमात चालूच ठेवले होते.

    *२६ जुलै १९०२ रोजी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात ५० टक्के आरक्षणाचा एक वटहुकूमच काढला.* त्यामुळे सनातनी लोकांचे आणखी पित्त खवळले.   संस्थानातील नोकऱ्यांमध्ये विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती ती शाहू महाराजांनी मोडीत काढली.

     नवीन आदेशानुसार बहुजन समाजातून पन्नास टक्के जागा भरण्यात येत होत्या. त्यामुळे गोर गरिबांच्या राहणीमान व जीवनमानात क्रांतिकारी बदल घडून आले.

    आपल्या राज्यात त्यांनी बाल विवाहाला प्रतिबंध केला तर विधवा विवाहांना परवानगी दिली. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. मंदिरातील विशिष्ट जातींच्या पुजाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढली. बहुजन समाजाची माणसे पुजारी म्हणून मंदिरात बसू लागले. लग्न लाऊ लागले.
             
    महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे कार्य शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात जोमाने चालू ठेवले होते.

    ते कलेचे उपभोक्ते होते. त्यांनी विविध कलांना राजाश्रय मिळवून दिला. कुस्तीची त्यांना आवड होती. त्यांची शरीरयष्टी बलाढ्य होती.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याला देखील शाहू महाराजांची खंबीर साथ होती. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात जी लोकशाही व्यवस्था राबविली तीच व्यवस्था डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधानातून प्रतिबिंबित केली.

    भारतातील लोकशाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ होते.

    *26 जून आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या 145 जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.*
    💐💐💐
    👏👏👏
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: