✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    पांडव_लेणीच_का_म्हणतात? बुद्ध_लेणी_म्हणायला_लाज_वाटते_का

    #पांडव_लेणीच_का_म्हणतात?
    #बुद्ध_लेणी_म्हणायला_लाज_वाटते_का

    जेव्हा बौद्ध लेणी हा विषय येतो तेव्हा सर्वप्रथम
    सम्राट अशोक हे नाव समोर येते, त्याच दैदीप्यमान राज्यकारभार, आपल्या जनतेला पोटच्या मुलाप्रमाणे उपमा देऊन त्याच संवर्धन करणारा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा चक्रवर्ती सम्राट अशोक आपण कधीच विसरू शकत नाही,

    कलिंग युद्धात विजय मिळवल्यानंतर पश्चाताप उदयास आला,
    त्यांच्यातील करुणा जागृत झाली,
    ज्या बुद्धांनी प्रज्ञा, शील, करुणा व  शांती सम्पूर्ण जगाला शिकवली तीच प्रेरणा घेऊन सम्राट अशोक सम्पूर्ण जम्बुद्विप मध्ये ह्या प्रेमाची शेती करायला निघाला आणि ती बीजे🌱 त्याने रोवली सुद्धा,

    जगाच्या इतिहासात असे अनेक राजे होऊन गेले ज्यांनी स्वत:चा पराभव झाल्यानंतर पुन्हा युद्ध न करण्याची शपथ घेतली होती; पण स्वत:चा विजय झालेला असताना सुद्धा, पराजितांबद्दल वाटणाऱ्या अनुकंपेने ज्यांचे मन दुःखी झाले आणि ज्यांनी त्यामुळे शस्त्रे खाली ठेवली असे कितीसे राजे होऊन गेले? कदाचित पूर्ण जगाच्या इतिहासात असे वागणारा फक्त एकच राजा होऊन गेला, ज्याचे नाव 'अशोक' होते.
    की पुन्हा कधीही शस्त्र हातात न घेण्याची त्याने शपथ घेतली,
    आणि ज्यामूळे त्याच्यात एवढा बदल झाला त्या बुद्धांनी दिलेले धम्मविचार समस्त मानव जातीला समजावे  वर्षावासात भिक्कु ना राहता यावे  म्हणून
    त्याने लेणी तयार करण्याच काम सुरू केलं..

    आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बौद्धलेणी
    अस्तित्वात राहतील यासाठी त्याने अखंड कातळात लेणी तयार करण्याचं काम सुरू केलं आणि ते पूर्णत्वास नेल,

    आणि अशा महान चक्रवर्ती सम्राटाचा इतिहास विसरण्याचा  वैदिकांनी केलेला डाव यशस्वी झाला  बौध्द लेणींना पांडव लेणी नामकरण करून
    त्या कशा पांडवांनी कोरल्या हे भाकडकथा मधून सांगण्यात आलं,
    आजचे इतिहास अभ्यासक सुध्दा ह्याच सत्य सांगायला का काटकसर करतात कोण जाणे ?
    पांडव बौद्ध असतील म्हणून त्यांनी पांडव लेणी तयार केल्या असे म्हणता येईल,
    आणि जर लेणी पांडवांनी कोरल्या तर
    बुद्ध अगोदर होऊन गेले
    आणि पांडवांनी बुद्धांना गुरू मानले असेल म्हणून त्यांनी बौद्ध लेणी कोरल्या असेही म्हणता येईल ,

    पण सत्य कधीच लपत नसते,
    ते उशिरा का होईना उजेडात येते,
    आणि सम्राट अशोकाचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर आला आणि बौद्ध लेणी कोरण्याच कारण सर्वाना समजत आहे फक्त समजत त्यांना नाही ज्यांच्या धडावर स्वताच डोकं नाही,
    लेणींचे सर्व श्रेय सम्राटालाच जाते,
    म्हणून सम्राटालाच ह्या वैदिकांनी लुप्त केले होते जेणेकरून सम्राट अशोक समजणार नाही आणी बौद्ध लेणी समजणार नाही,
    पण ब्रिटिशांनी पुरातत्व विभाग सुरू करून
    हा वारसा जतन करून संवर्धित करण्याचं
    मोलाचं काम केलं आहे त्यांना नमन
    तसेच ज्या अनामिक शिल्पकारांनी हे अप्रतिम शिल्प तयार केले त्यांना सुद्धा कोटी कोटी नमन
    सुनील उषा खरे
    #ABCPR_TEAM
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: