✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    ऐतिहासिक लेणी आणि ऐतिहासिक बौद्ध वास्तू बौद्ध समाजाच्या ताब्यात असाव्यात !

    *ऐतिहासिक लेणी आणि ऐतिहासिक बौद्ध वास्तू बौद्ध समाजाच्या ताब्यात असाव्यात !*


    आपल्या भारत देशात अनेक धर्मियांचा ऐतिहासिक वारसा ऐतिहासिक वास्तूंच्या रूपात अस्तित्वात आहे आणि त्या ऐतिहासिक वास्तू त्या त्या धर्मियांच्या ताब्यात आहेत,
    जसे की मुंबई हाजी अली दर्गा, अजमेरची गरीब नवाज दर्गा ही मुस्लिमांच्या ताब्यात आहे, अमृतसरचे हरमिंदर साहिब गुरूद्वारा(स्वर्ण मंदिर) हे शिखांच्या ताब्यात आहे, श्री सम्मेद शिखरजी (गिरिडीह, झारखंड) हे जैन धर्मियांच्या ताब्यात आहे, हिंदूंचे तर अनेक आहेत मग ऐतिहसिक बौद्ध लेणी आणि वास्तू हे बौद्ध धर्मियांच्या ताब्यात का नाही?

    बौद्धेत्तर धर्मियांच्या ऐतिहासिक वास्तू ह्या त्या त्या धर्मियांच्या ताब्यात आहे व तेथून मिळणारे उत्पन्न हे त्या त्या धर्मियांनी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या मालकीचे आहे आणि या उत्पन्नाचा वापर कसा करायचा हे त्या त्या धर्मियांच्या ट्रस्ट ठरवतात, काही प्रमाणात या ट्रस्ट हे उत्पन्न समाज कार्यात लावतात तर काही ट्रस्ट मनमानी कारभार करतात....असो ...माझा मुद्दा वेगळा आहे,

    भारत हे पुर्वीचे बौद्ध राष्ट्र ....!  म्हणून भारतात हजारो बौद्ध लेणी, स्तुप आणि इतर ऐतिहासिक वास्तू आहेत आणि या सर्व वास्तूंचा ताबा हा केंद्र सरकारचा आहे, या ऐतिहासिक बौद्ध वास्तूपासून पर्यटनाद्वारे सरकारला मिळणारे उत्पन्न आणि आंतरराष्ट्रीय देणग्या यातून प्रचंड पैसा सरकारला मिळतो, पण सरकार या पैश्याचे काय करते हे एक न उलगडणारे गुढ रहस्य आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारला या ऐतिहासिक बौद्ध स्थळांपासून पैसा मिळतो मग सरकार या बौद्ध वास्तूंची योग्य काळजी घेते का ?... तर नाही ,
    ह्या ऐतिहासिक वास्तू केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतात, या वास्तूंची निगा राखणे, संवर्धन आणि संरक्षण करणे हे पुरातत्व खात्याचे कर्तव्य आहे पण प्रत्यक्षात असे होतांना दिसत नाही, बहुतांश ऐतिहासिक बौद्ध वास्तूंची अवस्था बिकट आहे , त्यातल्या त्यात बऱ्याच ऐतिहासिक बौद्ध लेणींची अवस्था खुपच बिकट आहे,
           शेकडो एकरच्या परिसराच्या सुरुक्षेसाठी २-४ सरक्षा कर्मचारी असतात तेही खाजगी सुरक्षा कम्पनीचे ! हे सुरक्षा कर्मचारी सुरक्षा पुरतात तर कोणाला...कोपऱ्यात अश्लिल चाळे करणाऱ्या कपल्सला, स्वच्छता राखण्यासाठी १-२ कर्मचारी, लाईट आणि पिण्याच्या पाण्याची असेलच याची खात्री नाही. जेथे कर्मचारी आहेत तेथे त्यांची मुजोरी दिसून येते, तिकीट काऊंटरला लाईट नाही म्हणून पैसे घेऊन तिकीट दिले जात नाही, पैशाची लुट केली जाते, पर्यटकांकडून आणि बौद्ध अनुयायांकडून घेतलेल्या मोबदल्यात त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा सुद्धा दिल्या जात नाही, पर्यटकांसाठी आणि बौद्ध अनुयायांसाठी साधे पाणी आणि शौचालय उपलब्ध नसतात, परिणामी पर्यटकांची आणि बौद्ध अनुयायांसाठी गैरसोय होते आणि सोबतच त्या ऐतिहासिक बौद्ध वास्तूचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव खराब होते.

    आजही बऱ्याच लेण्या दुर्लक्षित आहेत, कित्येक लेण्या तर अश्या आहेत ज्यांचा थांगपत्ता सुद्धा पुरातत्व खात्याला नाही, अश्या लेण्यांवर हिंदू धर्मिय मंदीरे बांधून व बौद्ध मूर्त्यांचे रूपांतर देवी-देवतामधे करून, स्तुपांचे रूपातर पिंडीत करून अतिक्रमण करण्यात आले आहे, या अतिक्रमणाकडे प्रशासन कानाडोळा करून निमुटपणे गोड झोपेत गुंग आहे.

    वरिल सगळी परिस्थिती पाहता जसे इतर धर्मिय लोक आपल्या ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपत आहे तसेच ऐतिहासिक बौद्ध वास्तूंचा वारसा हा बौद्धांनीच जपला तर वरिल सर्व वाईट प्रकारांना आळा बसेल, बौद्ध सुद्धा आपल्या ट्रस्ट स्थापन करून या ऐतिहासिक वारसाचे योग्य नियोजन करून संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करेल आणि यासाठी बौद्ध भक्कम आहेत मात्र आवश्यकता आहे बौद्ध एकत्रीकरनाची जी लेणींसाठी वेळ देईल प्रत्यक्षात काम करेल.

    भारतातील सर्व ऐतिहासिक बौद्ध वास्तूंचा वारसा जपण्यासाठी संवर्धन करण्यासाठी   ABCPR (Ancient Buddhist cave preservation Research) टीम संविधानिक रित्या प्रयत्न करत आहे.

    ........अmol (ABCPR Team)
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: