Buddha Teach
जगातील पहिले व्यंग चित्र ( शिल्प ) भरहूतच्या स्तुप स्तंभावरचेच..!
Monday, 30 September 2019
0
नमो बुध्दाय ..
जगातील पहिले व्यंग चित्र ( शिल्प ) भरहूतच्या स्तुप स्तंभावरचेच..... कारण हे शिल्प इ.स.पु. दुसऱ्या शतकात साकारल्या गेले !
दंतवैद्याकडे पाळलेले माकड असते . वैद्यबुआ एका व्यापाऱ्याचा दुखरा दांत उपटून त्याला वेदनामुक्त करतात , त्याचा मोबदला म्हणून व्यापारी सुकामेवा , फळे , खजूर व द्रव्यही देतो .
माकडाने हे बघितले ,. त्याने ठरविले ,की आपणही वैद्य झालोच पाहिजे .
त्याने त्याचा व्यवसाय सूरु केला ......
एक व्यापारी आपला दांत उपटून घेत आहे . भल्लीमोठी सांडसी लावलेली आहे . तीला दोर बांधून हत्ती ओढत आहे . हत्तीला उत्साह यावा म्हणून काही माकडे ढोल, पिपाणी, ताशे वाजवत आहेत ....
एक माकड तर चक्क हत्तीच्या शेपटीचा कडाडून चावाच घेत आहे ...
दुखरा दांत व माकडचाळे पाहून त्राग्याचे भाव व्यापाऱ्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत ...
आज हे शिल्प कलकत्ता वस्तुसंग्राहलयात आहे .
बौध्द जातककथामध्ये काही विनोदी जातककथाही आहेत .त्यातील ही एक विनोदी जातककथा आहे ,.
" आधा अधूरा हकीम , मरिज के लिए जान का खतरा ! "
महेन्द्र शेगांवकर...
बौध्द धम्म तत्वज्ञान, बौध्द संस्कृती, लेणी शिल्पकला,बौध्द धम्माचा प्राचीन इतिहास अश्या विविध धम्मतील माहिती मिळवण्यासाठी खलील लिंक वर जाऊन फोल्लोव करा.
महेन्द्र शेगांवकर
https://www.facebook.com/mahendra.shegaonkar

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment