✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    5 फेब्रुवारी 1951 रोजी बाबासाहेबांनी हिंदु कोड बील संसदेत सादर केले होते| कोड बिल बाबासाहेब आंबेडकर

    5 फेब्रुवारी 1951 रोजी बाबासाहेबांनी हिंदु कोड बील संसदेत सादर केले होते.हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकर
    =========================

    स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती कि तमाम स्त्रियांना या जाचक रूढी आणि परंपरा मधून मुक्त करावे आणि ते आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले. बाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते आणि 5 फेब्रुवारी 1951 रोजी संसदेत मांडले. स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते.

     हे सात घटक खालीलप्रमाणे-

    1)जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत.
    2)मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार
    3) पोटगी
     4) विवाह
    5)घटस्फोट
    6) दत्तकविधान
    7)अज्ञानत्व व पालकत्व.
    (हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकर)
    हे सातही विषय स्त्रियांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच ! भारतीय संविधान परिषदेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल, अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्त्वांचा अंगीकार केलेला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला, हे अतिशय दुर्दैवी होते. या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी प्रचंड विरोध केला.अखेर पंतप्रधान नेहरु हे सनातन्यांपुढे झुकले व शेवटी हे बील संसदेत पारित होवु शकले नाही .
    (हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकर)

    त्यानंतर अतिशय उद्वीग्न होवुन बाबीसाहेबांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला .

    मनोजराव गवई
    5/2/2020

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: