*साऊ आम्ही तुझ्या लेकी.:-ब्लॉग

*साऊ आम्ही तुझ्या लेकी...*

साऊ म्हणजे सावित्रीबाई फुले स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून स्त्रीयांनसाठी पहिली शाळा सुरू करणारी माऊली. या माऊलीने स्त्रीयांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. सावित्रीबाई फुले यांनी या प्रवासात समाजाकडून त्यांना विरोध ही झाला परंतु त्या कधी खचल्या नाही मागे सरल्या देखील नाही आपला स्त्री शिक्षणाचा लढा चालूच ठेवला. स्त्री ही चुल आणि मुल यामध्ये न राहता शिक्षण घेऊन कोठे उच्च पदावर जावे असे त्यांना वाटत.

*‘विद्येविना मती गेली; मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली!*

*गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.’*

असे म्हणत महात्मा जोतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले साऊ यांना शिक्षणाचे धडे देत स्त्रीयांना शिक्षण देण्यासाठी पाठबळ दिले. या दोन्ही महापुरुषांनमुळे आजच्या शतकात बऱ्याच स्त्रीया शिक्षण घेऊन उच्च शिक्षित झाल्या. सावित्रीबाई फुले पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका,फातिमाबिबी मिरासाहेब भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989),कार्नेलिया सोराबजी पहिली भारतीय महिला बॅरिस्टर,हंसाबेन मेहता भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949),मदर टेरेसा नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979),अरूंधती रॉय बुकर पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997),भानू अथय्या ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला,मंजुळा पद्मनाभन पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982),डॉ. आनंदी गोपाळ जोशी विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर,कमला सोहोनी केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ,किरण बेदी पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972),कल्पना चावला अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997),बच्चेंद्री पाल एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984),संतोष यादव दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक,करनाम मल्लेश्वरी ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल,आरती साहा इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू,कॅप्टन चंद्रा पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला,संगीता गुजून सक्सेना युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर,उज्ज्वला पाटील-धर शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला,डॉ. अदिती पंत अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ,सुरेखा यादव-भोसले आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर,देविकाराणी रौरिच दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969),रिटा फारिया पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)
,सुष्मिता सेन पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994),डॉ. इंदिरा हिंदुजा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर,इंदिरा चावडा भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी,शीतल महाजन पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला
स्रोत - शिक्षक मंच अशा वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रीयांनी शिक्षित होऊन पदभार हाती घेतलेल्या या महिला.
साऊ तुझ्या लेकी शिकल्या, उच्च पदावर ही गेल्या परंतु तुझ्या लेकी अजूनही स्वतला सुरक्षित असल्याचे त्यांना वाटत नाही. या आजच्या २१ व्या शतकात साऊ तुझ्या लेकी सुरक्षित नाहीत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या रयतेचे रक्षण पुर्णपणे केले परंतु आजचा समाज स्त्रीयांचे रक्षण हे वेशीवर टांगले आहे. स्त्रीयांनवर वाढते अत्याचार, बलात्कार, शोषण, छेडछाडी प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.दिल्लीतील निर्भया बलात्कार,उन्नाव बलात्कार प्रकरण,कथुआ आसिफा बलात्कार प्रकरण,खैरलांजी हत्याकांड,मथुरा बलात्कार प्रकरण,२०१९ हैद्राबाद सामूहिक बलात्कार प्रकरण असे अनेक प्रकरण या भारतात समोर आले आहेत. आणि त्यात आणखी एक भर पडली कालचीच वर्धा येथील हिंगणघाट येथील २५ वर्षीय कॉलेज शिक्षिकेवर एका माथेफिरू एकतर्फी प्रेम करणाऱ्या विवाहित तरुणाने अंकिता पिसुदे हिला भर रस्त्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले. साऊ ही तुझी लेक आज जीव मुठीत घेऊन रूग्णालयात उपचार घेत आहे. ती ४० टक्के जळाली आहे.
साऊ बघ तु ज्या लेकींना शिक्षित केले चुल आणि मुल यासाठी मर्यादित न राहता स्त्रीयांनी पुरुषांच्या बरोबरीने चालावे परंतु स्त्री तर पुरूषांच्या बरोबरीने चालते तर आहे परंतु आजच्या समाजातील काही माथेफिरू तरुण जे त्यांच्या गरजा भागविण्यासाठी तुझ्या लेकींचा अशा प्रकारे छळ करून अत्याचार, बलात्कार, शोषण करीत त्यांच्यावर हल्ले करीत आहे. मेणबत्तीला जाळण्यात येत आहे तरीही समाज उघड्या डोळ्यांनी बघत बसला आहे.
साऊ आम्ही सर्व पिडीत तुझ्या लेकी आहोत आम्हाला अशा प्रकारे जाळले जाते पण आजची स्त्री तु दिलेल्या शिक्षणाचा अभ्यास करीत स्वबळावर लढत स्वतः प्रज्वलित होऊन शाहू,फुले, आंबेडकर यांच्या विचारांची जर मशाल हाती घेऊन आम्ही चालायला हवे. जसे मेणबत्ती म्हणून आम्हाला जाळले जाते त्याच प्रकारे आम्ही साऊ तुझ्या लेकी देखील आता आम्ही मेणबत्ती होऊन समाजातील अशा माथेफिरू हैवानांना जाळण्याचे शस्त्र हाती घेऊ

कवी/लेखक -: *प्रतिक कांबळे, पवई,मुंबई,९७०२२०६३७२*
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel