स्वतःस हिंदू म्हणून घेणे वैदिकांची मजबुरी?

स्वतःस हिंदू म्हणून घेणे वैदिकांची मजबुरी?

भारताचा अंदाजे 3000 वर्षाचा इतिहास उपलब्ध आहे, या इतिहासात फक्त काही शतक वैदिकांना येथील जनतेपासून वेगळेपण दाखवून सत्ताभोगता आली, बुद्धांच्या काळी वैदिकांनी अल्पसंख्याक असल्याने आज ज्या प्रमाणे हिंदूचा सहारा घेत आहेत त्या प्रमाणे महायानी पंथाचा सहारा घेत वरून बुद्धिस्ट पण आतून आपले श्रेष्ठत्व जोपासण्याचा प्रयत्न केला, आणि संधी मिळताच कपट करून बुद्धिस्ट राजा बृहदत्त याची हत्या करून पुष्यमित्र शुंगाच्या रूपाने वैदीक राजा बनविला,बुद्ध अनुयायांचा अतोनात छळ केला, बौध्द भिक्खुच्या कत्तली केल्या, अल्पसंख्याक असल्याने या वैदिकांना सैनिकांची आवश्यकता होती, जाच  आणि अन्याय अत्याचारामुळे जे  बौद्ध शरण आले त्यांचा वापर यांनी सैनिक (क्षत्रिय ) म्हणुन केला, अशाच प्रकारे वैश्य आणि शुद्र (सेवेकरी) असे समूह निर्माण केले, या तिघांचा वापर वैदिकांनी त्यांना गुलाम बनवून हीन वागणूक देत स्वतःच्या फायद्यासाठी केला, यांनाच कालांतराने हिंदू संज्ञा देत , जे बौद्ध वैदिकांना कधीच शरण गेले नाही, अशा बौद्धांना अस्पृश्य बनवून  त्यांचे दमन करण्यासाठी षडयंत्र करत, सारखे चिथावणी राहिले, तसे पाहायला गेले तर आजचे हिंदू आणि अस्पृश्य दोघेही प्राचीन काळी बुद्धांचे अनुयायी होते, आजचे हिंदू आणि अस्पृश्य यांना आपण प्राचीन काळी बुद्धिस्ट होतो याची जाणीव होऊ नये म्हणुन, मनुस्मृती, वेद, पुराणे,उपनिषदे सारख्या भाकड कथा लिहून बुद्ध धम्मातील प्रतीकांचा व व्यक्तिरेखा, व बुद्धिस्ट राजे यांना चमत्कारी देव व देवी बनविले, त्यांची उपासना करायला मजबुर केले, यामुळेच बुद्ध धम्मातील पवित्र दिन आणि आजचे सण एकच आहेत फक्त कथा वेगळ्या आहेत.यामुळेच भारतात कोठेही उत्खनन केले तर तेथे बुद्ध धम्माची प्रतीके किंवा बुद्ध मूर्ती मिळतात.

      अशाप्रकारे वैदिकांनी देशावर सत्ता स्थापन केली, परंतु अल्पसंख्याक असल्याने त्यांच्या मनात सतत भीती होती की
त्यांचे अल्पसंख्याकत्व येथील बहुजनांच्या लक्षात येता कामा नये, यासाठी त्यांची अनेक शक्कली लढवत येथील बहुसंख्य जनतेला कशात ना कशात व्यस्त ठेवले, अल्पसंख्याक वैदीक आणि त्यांनी निर्माण केलेले क्षत्रिय दोन्ही मिळविले तरी देशाची सुरक्षा अल्पसंख्याक जनतेच्या हातात गेली, बाकी जनतेवर वैदिकांनी धर्माच्या नावाखाली अनेक जाचक अटी लादल्या त्यांना शिक्षण बंदी केली, शस्त्र बंदी करून संपत्ती बाळगण्यापासून  वंचित केले, याचा फायदा उचलून वैदीक राजांचा पराभव करून मुघलांनी सत्ता स्थापन करून आपले साम्राज्य निर्माण केले, या मुघलांना वैदिकांनी छाती ठोकून सांगितले की आम्ही हिंदू नसून वैदीक आहोत, त्यामुळे आम्हाला हिंदू सारखी वागणूक देऊ नये, हे वैदिकत्व छ. शिवाजी महाराजांपर्यंत कायम होते, छ.शिवाजी महाराजांना या वैदिकांनी शुद्र म्हणून जाहीर करून वेदांचे मंत्र नाकारले होते, जे जगजाहीर आहे, कारण शूद्रांना राज्यभिषेकाचा अधिकार नाही असे या वैदिकांचे धर्म शास्त्र मनुस्मृती सांगते, मग त्यांनी महारठ्ठातील असूनही छ. शिवाजी महाराजांचे कुळ राजस्थानातून आल्याचे  दाखवून त्यांना क्षत्रिय बनवून त्यांचा राज्यभिषेक केला, 17-18  व्या शतकापर्यंत वैदीक स्वतःला हिंदू समजत नव्हते, अगदी शाहूमहाराजांनाही त्यांनी वेदांचे मंत्र नाकारून शुद्र समजले होते, मग 19 व्या शतकातच अशी काय गरज निर्माण झाली की वैदिकांना हिंदुचा मुखवटा धारण करावा लागला, याचे खरे कारण असे की वैदीक म्हणून आपण या देशावर सत्ता गाजवू शकत नाही याचा वेळोवेळी आलेला अनुभव आणि संत आणि महापुरुष यांनी जनतेमध्ये निर्माण केलेली जागृती.या जागृती मूळे येथील बहुसंख्य जनतेला कळून चुकले की आपण बहुसंख्य असूनही अल्पसंख्याक वैदिकांचे गुलाम का म्हणून जगायचे, त्यांनी वेळोवेळी बंडाचा झेंडा उभारला, हे बंड शमविण्यासाठी अनेक कपटाचा सहारा घेतला, शेकडो साधू-संतांच्या हत्या वैदिकांनी घडवून आणल्या, शेवटी आपले मनुस्मृतीने अबाधित केलेले श्रेष्ठत्व कायम ठेवण्यासाठी दोन पावले मागे घेत मनाविरुद्ध वैदीक स्वतःला हिंदू म्हणून घेऊ लागले, हिंदूंनी आता तरी समजून घ्यावे की वैदिक काही करून आपले श्रेष्ठत्वाची जोपासना करतील, यासाठी ते देश, धर्म आणि जातिजाती मध्ये वाद निर्माण करून आपल्या अल्पसंख्याकत्वावरून लक्ष विचलित करतील, पण हिंदू आणि बौद्ध यांनी कोणत्याही परिस्थितीत वैदिकांच्या कपटाला, षडयंत्राला बळी न एकमेकांबद्दल द्वेषाची भावना बाळगू नये कारण शेवटी दोघेही याच भूमीतील आहोत हे विसरू नये, येथील बहुजनांना आपला खरा इतिहास कळू नये म्हणून वैदिक त्यांना 14-15व्या शतकापर्यन्त घेऊन जातात, त्या पलीकडचा इतिहास चुकूनही सांगत नाही.
      अल्पसंख्याक वैदिक समाजाने सुधरावे आणि आपला समाजा- समाजा मध्ये भांडणे लावण्याचा गुणधर्म त्यागावा, हिंदूंनीही वैदिकांच्या बहकाव्यात येऊन आपल्याच बांधवांबद्दल द्वेष - तिरस्कार  बाळगू नये, अज्ञानापायी आतापर्यंत सर्वांचे खूप नुकसान झाले आहे हे विसरून चालणार नाही, आता तरी वैदीक स्वतःला हिंदू म्हणून का घेत आहेत जे समजून घ्यावे?
......दिनकर  सोनकांबळे
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel