✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    चीन, कोरोना व्हायरस आणि बौद्ध धम्म समज गैरसमज

    *चीन, कोरोना व्हायरस आणि बौद्ध धम्म समज गैरसमज*

    मित्रांनो... सध्या संपूर्ण जगात कोव्हीडी -१९ म्हणजे कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून मृत्यूचे तांडव सुरू आहे.आज सर्व जग एक प्रकारे मृत्यूच्या दारात उभे असून कोरोना वर सध्या तरी प्रभावी लस व उपचार उपलब्ध नसून यावर सध्या एकच उपाय आहे तो म्हणजे स्वतःहून घरात राहणे व सोशल डिस्टन्स ठेवणे हाच होय.
      मित्रांनो कोरोना व्हायरस जसा जसा पसरत आहे तशा त्यामागे अफवा पसरत आहे आणि लोक अफवांना बळी ठरत आहे.त्यापैकी अफवा म्हणा किंवा सत्यता म्हणा पण महत्वाचे असे की काही लोक म्हणतात चीन माणसे नको त्या प्राण्यांचे मांस भक्षण करतात उदाहरण म्हणजे वटवाघूळ खाल्याने कोरोना होतो हे सत्य आहे की अफवा हे येणारा काळच ठरवेल.दुसरी गोष्ट अशी की कोरोना व्हायरस हा चीनने तयार केलेला जैविक अस्त्र आहे यात ही सत्य व असत्य हा येणारा काळच ठरवेल.

       पण यात मात्र एक गोष्ट मला प्रकषाने जाणवली ती म्हणजे काही नतद्रष्ट व या ही परिस्थितीत राजकिय व धार्मिक पोळी भाजून घेणारे काही महाभागांनी अफवा पसरवणे चालू केले की चीन मधले बुद्धिस्ट लोक हे जनावरांचे मांस भक्षण करतात म्हणून हा रोग पसरला. जाणूनबुजून बौद्ध धम्माला बदनाम करण्याचे कारस्थान काही टवाळ टोळक्यांनी सुरू केले आहे.
       त्यांना मला एकच सांगायचे आहे की बुद्ध धम्म हा मानवतावादी, भूतदयावादी व अहिंसक धम्म असून यात प्राणी हत्या मानव हत्या वर्ज्य आहे.
    राहिला प्रश्न चिनी लोकांनी मांसाहार करण्याचा तर तो तेथील जीवनशैलीचा भाग आहे.कोणता ही धर्म हा हिंसा,अंधश्रद्धा,अमानवीय व्यवहार,पर धर्म द्वेष शिकवत नाही,उलट काही नालायक लोक स्वार्थासाठी असले उपद्रव करत असतात व आपल्या धर्माला बदनाम करतात तसेच इतर धर्म कसा वाईट आहे हे सांगण्यासाठी अफवांची खसखस पिकवत असतात.कोणताच धर्म वाईट शिकवण देत नसून अनुयायी कसे वागतात यावर सर्व अवलंबून आहे.

    सांगायचे तात्पर्य असे की बुद्धिस्ट लोकांमुळे कोरोना व्हायरस पसरला हा खोटा व खोडसाळ प्रचार काही नतद्रष्ट लोक करत असून ही निव्वळ अफवा आहे.उलट जो कोणी अशी अफवा पसरवत असेल त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात कलम २९५ ( अ) अंतर्गत धार्मिक भावना दुखवल्याची केस होऊ शकते.
    त्यामुळे कोणीही कोरोना व्हायरस बद्दल सत्यता जाणून न घेता व ठोस पुरावे नसतांना अफवा पसरवू नका.

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    *बुद्धराज अर्जुनराव गवळी ( राजन )*
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: