✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    आता कलिंग कुठे आहे ? Where is Kalinga Region ?..

    *आता कलिंग कुठे आहे ?* Where is Kalinga Region ?

    कलिंग हा एकेकाळचा प्राचीन प्रांत सद्यस्थितीत आंध्र प्रदेश,ओरिसा आणि छत्तीसगड राज्यात विभागला गेला आहे.  इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात युद्ध झाल्यावर तो भाग मौर्य राजवटीच्या अंतर्गत आला. कलिंग म्हणजे भारताच्या पूर्वेकडील किनारी प्रदेश होय. महानदी व गोदावरी नद्यांच्या मधील व महेंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेली ती मोठी नगरी होती असा पुरातन साहित्यात उल्लेख आहे. आताच्या ओरिसामधील गंजम जिल्ह्यात तो भाग येतो. प्राचीनकाळी कलिंगाचे मुख्यालय तोसली येथे होते. बाभूनेश्वर,बंगाल, बांगलादेश या नावांचा उगम बौद्ध संस्कृती वरूनच झालेला आहे. कलिंग युद्ध हे मौर्य सम्राट अशोकराजा व कलिंग राजा अनंता (सुरथा) यांच्या मध्ये झाले.

    कलिंग येथील लोक बऱ्याच शास्त्रात तरबेज होते. जहाज बांधणीचा त्यांचा मोठा व्यवसाय होता. समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मोठी बंदरे होती. तिथून परदेशात व्यापार चालत असे. त्यामुळे या भागात भरभराट होऊन येथील उत्कर्ष झालेल्या वसाहतीला उत्कल म्हणत. सम्राट अशोक यांचे आजोबा चंद्रगुप्त यांनी पूर्वी कलिंग प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो असफल ठरला. येथे दया नदी असून ती चौखाई नदीची शाखा आहे. तिला पुढे अनेक नद्या मिळून ती पुरी जिल्ह्यातून वाहत ईशान्य दिशेस चिलिका तलावात मिळते.

    धौली टेकड्या या दया नदीच्या किनाऱ्यावरती आहेत. भुवनेश्वर पासुन हे ठिकाण ८ कि.मी. अंतरावर आहे. येथील टेकड्या सोडल्या तर बाकीचा भूप्रदेश सर्व सपाट आहे. इथेच सम्राट अशोकराजा यांचा शिलालेख आहे. आणि हीच जागा कलिंग युद्धाची जागा म्हणून मानली गेली आहे. युद्धा नंतरची परिस्थिती पाहून सम्राट अशोकांना पश्चाताप झाला. अंतःकरणात दया-करुणा दाटली आणि त्या नदीचे नाव सुद्धा दया झाले. तसेच युद्धामध्ये धुरळा उडाला आणि अनेकांची धूळधाण झाली आणि म्हणून इथल्या टेकड्यांना धौली नाव पडले, असे समजले जाते. युद्धानंतर धम्माच्या आश्रयास गेल्यावर येथेच धौलीच्या आसपास सम्राट अशोकांनी अनेक चैत्य, स्तूप,स्तंभ आणि विहार उभारले. संपूर्ण उत्कलवासी बौद्धमय झाले. आपल्या राष्ट्रगीता मध्ये येणारी ओळ 'द्राविड उत्कल बंग' यातील उत्कल म्हणजेच इथला प्राचीन कलिंगवासी बौद्ध समाज होय.

    --- संजय सावंत ( नवी मुंबई )

    ⚛⚛⚛
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: