✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    मुख्यमंत्री आणि गृह मंत्री याना हि सह आरोपी करा :- स्वतंत्र लोकसत्ता पक्ष

    पुरोगामी महाराष्ट्राची ही हत्या
    पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा भीमराज गायकवाड  बळी
    -----------------------------------------------------------------------
    लाख खंडाळा येथील देविदास छगन देवकर, रोहिदास छगन देवकर या भावांनी एका दलित कुटुंबावर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका निरपराध युवकाचा जीव गेला. भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७) या युवकाचे झाेपेतच मुंडके छाटून सूड उगवण्यात अाला.
     जातीवादी व्यवस्थेचा आणि पोलिसांच्या अकार्यक्षमते मुळेच भीमराज गायकवाड यांचा बळी गेला आहे.  मृत युवकाच्या वडिलांनी १३ मार्च रोजी वैजापूर पोलिसांसह जिल्हा पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन आपल्या जिवाला धोका असल्याचे कळवले होते. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखलच घेतली नसल्याने एका निरपराधाचा बळी गेला.

    मुख्यमंत्री आणि गृह मंत्री  याना हि सह आरोपी करा
    ------------------------------------------------------------------------.
    पुरोगामी महाराष्ट्रात दलित, बौद्ध , मुस्लिम  सुरक्षित नाही. खैरलांजी , शिर्डी, खर्डा, अंधारी, डोंगरगाव  आणि आता लाख खंडाळा.   अत्याचाराच्या ह्या घटना म्हणजे  सत्ताधारी आणि यंत्रणेच्या सहमतीनेच होतात. एका निष्पाप तरुणाची हत्या होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृह मंत्री अजूनही समोर येत नाही.   पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आणि त्यांचं पोलीस खात हेच भीमराज याच्या हत्येला जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री , गृहमंत्री , जिल्हाअधिकारी  आणि मोक्षदा पाटील याना हि भीमराज गायकवाड याच्या हत्येचे सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा हि मागणी स्वतंत्र लोकसत्ता पक्ष करत आहे.
    गुन्हा दाखल होत   नाही तोपर्यत तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही देत आहोत.

     रातांकर खंडागळे
    स्वतंत्र लोकसत्ता पक्ष
    Previous article
    Next article

    2 Comments to

    1. ही घटना खुप वाईट घडली आहे

      ReplyDelete
    2. ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी करणारा....याच तोंड फोडा😡

      ReplyDelete

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: