✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    बौद्धमय भारताचे प्रवेशद्वारे :- चारीधाम अर्थात सम्राट अशोक निर्मित स्मार्ट सिटी* भाग-१,

    *बौद्धमय भारताचे प्रवेशद्वारे :- चारीधाम अर्थात सम्राट अशोक निर्मित स्मार्ट सिटी*
    भाग-१,

    मित्रांनो चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी जगाला बरेच काही दिले आहे, त्या पैकी महत्वाचे म्हणजे, मानवता, अहिंसा,  शिल्पकला, वास्तुकला, महामार्ग , आरोग्य/ वैद्यकीय/औषधे, परराष्ट्र धोरण,वेगवेगळे शुद्धीकरण प्रकल्प आणि आता ज्यांचा बोलबाला होत आहे त्या स्मार्ट सिटी.व्यापारी दृष्टीने भव्य नगरांची निर्मिती सम्राट अशोक यांनी केलेली आहे,असा गौरवशाली सम्राट येथील अल्पसंख्याक  धर्माधानी अनुल्लेखाने संपविण्याचा प्रयत्न केला आहे, बौद्ध धम्मा फक्त आश्रयदाता बनून न थांबता या महान सम्राटाने इतिहासात सर्वश्रेष्ठ धम्म प्रसारक म्हणून आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. आज जनतेच्या हृदयात स्वतःचे वेगळे असे स्थान असणारे चारिधाम ऐतिहासीक दृष्टीने विचार केला तर व्यापाराबरोबरच धम्म धम्म प्रसाराची प्रमुख केंद्र होती, ही चारीधामे म्हणजे, बुद्धांचल (बद्रीनाथ), द्वारका, गंधमाधनम (रामेश्वरम) व जगन्नाथ पुरी होय.
     *रामेश्वरम*:- सम्राट अशोक यांचे शिलालेख, स्तंभलेख भारताबरोबरच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशात आढळून येतात. एका शिलालेखात तामिळनाडूच्या चोल राजवंशाचा उल्लेख आहे,मौर्य राजवंश व चोल राजघराणे यांचे मैत्रीचे संबंध होते, याच चोल राजघरान्याणे सम्राट अशोक यांचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा आपल्या सहकाऱ्यासोबत, धम्म प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला ज्या ठिकाणाहून गेले होते त्या ठिकाणी गंधमाधनम बुद्ध विहाराची उभारणी केली, ८ व्या शतकात आदी शंकराचार्य यांनी या प्राचीन विहाराचा जीर्णोद्धार करून त्याचे नाव रामेश्वरम ठेवले, म्हणून आज हे धम्माचे पवित्र ठिकाण रामेश्वरम या नावाने प्रसिद्ध आहे, आजच्या मंदिरात अनेक ठिकाणी बुद्ध धम्माची प्रतीके आपणाला बघायला मिळतात. या चोल राजाने वर्तमानातील थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इत्यादी देशांच्या काही भागावर सत्ता गाजविली होती, हे सर्व बुद्धिस्ट देश आहेत.

    *द्वारका*:- युआन संगवआणि ईतसिंग ने आपल्या ७ व्या शतकातील प्रवास वर्णनात गुजरात मधील वल्लभी महाविहाराचा उल्लेख केलेला आहे. त्याकाळी वल्लभीत थेरवादी बौद्धांची सर्वात मोठी संस्था होती. एकट्या वल्लभीत ७ व्या शतकापर्यंत 100 च्या वर बुद्ध विहारांची संख्या होती, आणि त्यामध्ये 6000 च्यावर बौद्ध भिख्खू वास्तव्य करत होते, या व्यतिरिक्त गिरनार (जुनागड) मध्ये ७ व्या शतकापर्यंत ५० बुद्ध विहार व 2000 च्यावर बौद्ध भिख्खू धम्म दानाचे काम करत होते.या वल्लभीने नांलदा सारखेच वल्लभी नावाने  बौद्धविश्व  विद्यालय उभारले. युवान संग याने केलेल्या प्रवास वर्णनात गुजरात मधील बुद्ध विहाराबद्दल विस्तृत माहिती दिली ती अशी,
    १) भरूकच्च ( भरुच):- १० बुद्ध विहार आणि 300 भिख्खू,
    २) खेडा:- १० बुद्ध विहार आणि १००० भिख्खू,
    ३) वल्लभी:- १०० बुद्ध विहार आणि ६००० भिख्खू ,
    ४) आनंदपूर ( वाडनगर) :- १० बुद्ध विहार आणि १००० भिख्खू, ५) सुरत:- ५० बुद्ध विहार आणि ३००० भिख्खू,
    ६) कच्छ :- १०० बुद्ध विहार आणि ६००० भिख्खू ,
    ७) द्वारका:- १०० बुद्ध विहार आणि १०० भिख्खू, आता काही वर्षांपूर्वी जुनागढ जिल्ह्यातील मंगरोल गावातून उत्खननात अंदाजे १००० वर्षांपूर्वीच्या २५ मूर्ती आढळून आल्या आहेत त्यापैकी २० मूर्ती एकट्या बुद्धांच्या आहेत, यावरून द्वारकाच काय संपूर्ण गुजरात बौद्धमय होता हे सिद्ध होते..(यामुळेच प्राचीन द्वारका बुडवावी लागली)
    (क्रमशः)
    ..दिनकर सोनकांबळे
    Dinkar Karbhari Sonkamble
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: