✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    तर जागतिक पुस्तक दिन हा 14 एप्रिल किंवा 6 डिसेंबर च राहिला असता..!

    जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.
    जगातील बहुसंख्य लोकं करमणूक प्रधान साहित्य वाचत असल्याने, निवडकर्त्यानी 23 एप्रिल हा(शेक्सपिअर स्मृतिदिन) जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले असावे.

    जगाची पुनर्रचना करणाऱ्या तत्वज्ञान, संशोधनात्मक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक विषयांवर आधारित लिखाण करणाऱ्या लेखकांना समर्पित जर जागतिक पुस्तक दिन साजरा करायला पाहीजे, असा निकष लावला असता तर...

    #जागतिक_पुस्तक_दिन_हा_14_एप्रिल_किंवा_6_डिसेंबर_च_राहिला_असता...
    कारण
    1) जगातील सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची.
    2) बुद्ध आणि त्यांचा धम्म, भारतीय संविधान, प्रॉब्लेम ऑफ रुपी, स्मॉल होल्डिंग इन इंडिया, स्टेट्स अँड मायनोरिटी, थॉट्स ऑन पाकिस्तान,शूद्र पुर्वी कोण, अस्पृश्य मुळचे कोण, हिंदू कोड बिल, बुद्ध की कार्ल मार्क्स सारखे वेगवेगळ्या विषयांवर प्रभावी लेखन एकच व्यक्ती करू शकतो यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
    3) जगातील सर्वात जास्त पुस्तके कोण्या एका व्यक्तीवर आणि कोणत्या व्यक्तीच्या शोधावर, तत्वज्ञानवर,विचारांवर लिहिल्या गेली असतील तसेच जगातील सर्वात जास्त कविता, गाणी, गझल कोणावर लिहिल्या गेली असतील तर ते आहेत फक्त
    #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर....
    डॉ बाबासाहेब आंबेडकर थॉट्स मध्ये M A  करतांना शैक्षणिक सहली निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिलिंद महाविद्यालयातील वाचनालय बसुन वाचन करण्याचा अविस्मरणीय क्षण शेअर करण्याचा मोह आवरता येत नाही.


    जय भीमच
    संदीप राऊत
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: