✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२० संबंधित...आंबेडकरी जनतेने आवर्जून वाचावी

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२० संबंधित...

    १] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डिजीटल होत आहे.?
    उत्तर :- होय.

    २] डिजिटल जयंती म्हणजे काय ?
    उत्तर :- अत्याधुनिक उपकरणे जसे स्मार्टफोन, लॅपटॉप यावर विविध कार्यक्रम घेणे जसे संगीत, भाषण किंवा अनेक आठवणी लाईव्ह किंवा एक्सक्लुझीव सांगणे..

    ३] पण असे का करायचे?
    उत्तर :- कोविड-१९ नावाचा संसर्गजन्य आजार जगभरात थैमान घालत आहे, सरकारने सोशल डिस्टसिंग पाळायला सांगितले. म्हणून यंदा घरातूनच जयंती व्हावी.

    ४] मग मिरवणूक नाही निघणार..?
    उत्तर :- नाही, देशभरात संचारबंदी चालू आहे, एक सुजाण नागरिक व कायद्याचा पाईक म्हणून आपले कर्तव्य सरकारला साथ देणे आहे. म्हणून घराच्या बाहेर न निघालेलेच बरे..

    ५] D. J नाही लावता येणार..?
    उत्तर :- नाही, घरातील साउंड सिस्टीम असेल तर कमीत कमी आवाजात वाजवावा. आजूबाजूची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर असेल तर वाजवू नये. आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य होऊ नये याची दखल घ्यावी.

    ६] बुध्द विहारात वंदना घेत येईल का ?
    उत्तर :- नाही, पाच लोकांसाठीही परमिशन घ्यावी लागेल.

    ७] जयंती साजरी कशी करावी?
    उत्तर :- गोड-धोड बनवावे, पांढरे शुभ्र वस्त्र घालावी. वंदना घ्यावी, नसेल येत तर यूट्यूबवर सहज उपलब्ध आहेत. बाबासाहेबांचे अनेक सिनेमाही उपलब्ध आहेत ते बघावे.

    ८] अजून काय करता येईल?
    उत्तर :-  गरीबांना व गरजू लोकांना पोट भरण्यासाठी काही दिवसांकरिता जेवणाची व्यवस्था करावी. शरीर रचना चांगली असल्यास रक्तदानाची तारिख ठरवून घेणे..

    ९] वा छान! अजून काय करु शकतो?
    उत्तर :- बाबासाहेबांचे किंवा कोणतेही आदर्श असे घरातील पुस्तके वाचावीत.  Pdf स्वरूपात पण पुस्तके उपलब्ध होतात, कोणत्याही व्हाटसप गृपला मिळतील.

    १०] मस्त, खूप छान भावा ! आवडले.. मी असेच करेल..
    उत्तर :- थांब!, शेवटचे सांगतो संकल्प करायला विसरू नको ! घरातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन उच्च शिक्षणासाठी दृढ निश्चय कर.. एरियात एखाद ग्रंथालय उभे करण्यासाठी लोक तयार कर. शिक्षणाचे महत्व समजून घे व इतर्र ही समजावून सांग..
    चल जयभीम!! जय भारत!!🙏🏻💙🇮🇳🇪🇺

    तळटीप :- सहमत असाल तर पुढे पाठवा...
    Previous article
    Next article

    1 Comments

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: