✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    राष्ट्रपती_पदाचा_अर्ज_नाकारणारे_बाबासाहेब आंबेडकर

    #राष्ट्रपती_पदाचा_अर्ज_नाकारणारे_बाबासाहेब

    "डॉ.बाबासाहेब आंबेडकर  आणि विनोद",या पुस्तकाचे लेखक,प्राध्यापक,दामोदर मोरे,आणि पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांचे"डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वसमावेशक सामाजिक धोरण" या विषयावर सह्याद्री चॅनलवर "सखी-सह्याद्री" या कार्यक्रमात चर्चासत्र घेतले होते,त्यावेळी प्रा.दामोदर एक महत्वाची आठवण सांगतात की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी वर्षांमध्ये डॉ.माईसाहेब आबेडकर यांची मुंबई दुरदर्शनला मुलाखत घेतली होती,आणि त्यानंतर प्रा.मोरे, माईसाहेबांसोबत उत्तर भारताच्या प्रवासासाठी गेले होते,त्यावेळी प्रवासादरम्यान बाबासाहेबांच्या आठवणी त्या सांगत होत्या


    अशीच एक आठवण सांगताना त्या म्हणाल्या की,भारताच्या पहिल्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होती,त्यावेळी नेहरु प्रधानमंत्री होणार होते,पण,स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती बाबासाहेबानी व्हावे अशी नेहरूंची इच्छा होती,आणि त्यामुळे नेहरूंनी बाबासाहेबांना फोन केला,त्यावेळी बाबासाहेब घरी नव्हते,नंतर नेहरूंनी घरी उमेदवारी अर्ज पाठवला,बाबासाहेब घरी आल्यानन्तर माईसाहेब म्हणाल्या की,तुम्ही तो नेहरूंनी पाठवलेला राष्ट्रपती पदाचा अर्ज भरून पाठवा,त्यावेळी बाबासाहेब काहीच म्हणाले नाहीत,शांत होते,पुन्हा नेहरूंचा फोन आला,तेव्हा माईसाहेबांनी,बाबासाहेबांना तो अर्ज भरून पाठविण्याची आठवण करून दिली,शांत असलेले बाबासाहेब अचानक उसडून उभे राहिले आणि म्हणाले #माझी_लायकी_पंतप्रधान_होण्याची_आहे_मला_स्टॅम्प_व्हायचे_नाही.

    बाबासाहेबांचा स्वतःच्या ज्ञाना विषयीचा आत्मविश्वास आपल्याला इथे दिसून येतो,लब्यु बाबासाहेब..

    #जयंती_महामानवाच्या_विचारांची
    #जयंती_राष्ट्रीय_हित_जपण्याची
    #जयंती_घराघरातून_जयंती_मनामनातून
    #संयुक्त_जयंती
    #Digital_Jayanti


    .........Jay

    आपण लेख लिहिले असेल तर आम्हाला पाठवा. सदर वेबसाईटवर प्रकाशित केले जाईल....

    9930791372
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: