✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    समग्र बाळासाहेब आंबेडकर समजून घेतांना :- भाग 1

    *💥समग्र बाळासाहेब समजून घेताना💥*

    उद्या 10 मे रोजी ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचा 66 वा वाढदिवस आहे त्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टी ज्या बद्दल मी वाचन मनन चिंतन केलं आहे त्या विस्ताराने मला मांडाव्याश्या वाटतात कारण खूप काही गोष्टी अश्या आहेत की ज्या बद्दल लोकांना माहिती नाहीत त्या मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे..
    बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्म 10 मे 1954 रोजी मुंबई या ठिकाणी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट सॅटनिस सेन्स हायस्कूल व उच्च शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई या ठिकाणी झाले.
    त्यांचा विवाह 27 नोव्हेंबर 1993 अंजलीताई मायदेव यांच्याशी झाला..
    कोणत्याही चळवळीच्या नेतृत्वाला विचारधारा,निश्चित कार्यक्रम,मजबूत संघटनात्मक बांधणी,हे सर्व नेतृत्वगुण लागतात हे सर्व नेतृत्वगुण ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या मध्ये जन्मजातच होते कारण ते जगातील सर्वात विद्रोही बंडखोर नेत्याचे नातू म्हटल्यावर विषय आहे का ?

    सामाजिक राजकीय
    जीवनात पदार्पण

    1982 साली मुंबईत बाबासाहेबानी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याला ऍड.बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते..
    व याच मेळाव्यात साहेबांनी सम्यक समाज आंदोलन या संघटनेची स्थापना केली..

    सम्यक समाज आंदोलनाच्या माध्यमातून जातीयता,रोजगाराच्या संदर्भात,किमान वेतन,स्त्रियांचे भूमिहीन मजुरांचे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन 2 मार्च 1983 रोजी नाशिक येथे सामाजिक व आर्थिक लढ्याला सुरवात केली..असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन समाजातील विविध प्रश्नांची जाणीव शासनाला करून दिली मुंबई विधानभवनावर पायी मोर्चा काढला त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले त्यात नामांतराचा प्रश्न असेल वाढत्या महागाईला विरोध भूमिहीन शेतमजुरांना पडीक जमिनी द्याव्यात अनुसूचित जाती व जमातींच्या सवलतींचा प्रश्न..
    बाळासाहेब आंबेडकरांनी 27 नोव्हेंबर 1983 ला सिद्धार्थ विहार वडाळा येथे काही समविचारी लोकांची बैठक बोलाविली या बैठकीत बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली..
    व त्या दिशेने वाटचाल सुरू झाली..

    क्रमश..

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: