समग्र बाळासाहेब आंबेडकर समजून घेतांना :- भाग 2
Saturday, 9 May 2020
0
ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक धोरण
ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा प्रश्न घेऊनच सार्वजनिक जीवनात प्रवेश केला 1982-83 ला गायरान जमिनीचा प्रश्न घेऊन लढा उभा केला 1983 ला वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचा इशारा मोर्चा काढला दादासाहेब गायकवाड यांच्या नंतर गायरान जमिनीचा मोठा लढा उभा केला..
1985 ला बाळासाहेब आंबेडकरांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी माणगाव ते पुणे असा लॉंग मार्च काढला हा लॉंग मार्च काढण्या मागचा मुख्य उद्देश हा होता की शासनाने कारखाना हा केंद्रबिंदू म्हणून वाटचाल केली परंतु त्या भागातील शेतकरी हा कधीही केंद्र बिंदू मानला नाही बाळासाहेबांची बहुजन चळवळीत शेतकरी भूमिहीन शेतमजुरांच्या हक्कांसाठी लढा उभारण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे.
त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकरिता शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता निर्माण होईल असे कृती कार्यक्रम धोरण निश्चित करावेत अशी भूमिका घेतली होती..
बाळासाहेब आंबेडकर यांच्या लॉंग मार्चचा परिणाम म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला व साखर कारखान्यातील राखीव जागा भरण्यात आल्या..
बाळासाहेबांनी सामाजिक राजकिय जीवनाला सुरवात करताना कधीच भावनिक पारंपरिक विषय हाती घेतले नाही तर बहुजनांना वंचितांना उपेक्षितांना हक्काच्या जमिनी मिळाव्यात सर्वसामान्य माणसाच्या हक्काच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी लढे उभारले बाळासाहेबांनी केलेल्या आंदोलनाच्या दबावातून 14 एप्रिल 1990 ला सुधाकरराव नाईक मंत्रिमंडळाने शासकीय आदेश जारी करून भूमिहीनांना जमिनीचे पट्टे दिले..
20 सप्टेंबर 2006 ला शेगाव या ठिकाणी शेतकरी परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या कापसाला भाव शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती हा विषय घेऊन डाव्या आघाडीचे कॉ. प्रकाश करात यांना सोबत घेऊन शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला या शेतकरी परिषदेला लाखो शेतकरी उपस्थित होते..
या वेळी संबोधित करताना बाळासाहेब म्हणाले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे हा विषय आमच्या साठी अतिशय महत्वाचा आहे या वेळी बाळासाहेबांनी जाहीर आवाहन केले संपूर्ण कर्जमुक्तीचे श्रेय कुणाला जाईल हा प्रश्न महत्वाचा नाही काँग्रेसने सोनिया गांधींना विदर्भात बोलावून त्यांच्या हस्ते कर्जमाफी करावी परंतु शेतकरी कर्जमुक्त होणे हा विषय महत्वाचा आहे बाळासाहेबांना शेतकऱ्यासाठी प्रचंड आत्मीयता आहे तळमळ आहे या साठी बाळासाहेबांनी वेळोवेळी मोर्चे निदर्शने आंदोलने केली आहेत राष्ट्राचा पोशिंदा कर्जमुक्त व्हावा त्याच्या मालाला हमीभाव मिळावा या साठी बाळासाहेब श्रेयाच्या राजकारणात कधीच गेले नाही या साठी बाळासाहेब न्यायालयीन लढा सुद्धा लढला आहे.बाळासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी फक्त विचार व्यक्त केले नाही तर त्या साठी लॉंग मार्च शेतकरी अधिवेशने निदर्शने मोर्चे आंदोलने न्यायालयात उभे राहून युक्तिवाद केले आहेत..
क्रमश..
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment