Buddha Teach
बौद्धिक क्रांतीच्या गतीस सद्गती लाभण्यासाठी तथागत गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाची गरज.
Thursday, 7 May 2020
0
*बौद्धिक क्रांतीच्या गतीस सद्गती लाभण्यासाठी तथागत गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाची गरज.*
तथागत बुद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा काय संबंध! असे जर आपण म्हणत असाल तर मीच नाही, इतिहास म्हणेल फारच जवळचा संबंध आहे.
तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी आधी विचार करावा लागतो पण तो विचार स्वतःच्या निर्णय क्षमतेवर प्रगल्भ विश्वास, कारण आणि कार्यक्षमतेशी असणारी न्याय बुद्धी याची जोड असावीच लागते. या सर्व विचारांवर मानवाला विचार करण्यास भाग पाडणारे *तथागत गौतम बुद्ध* हे पहिलेच तत्वज्ञ इतिहासात दिसून येतात.
काही विचारवंतांनी तसेच धर्म संस्थापकांनी कोणी ईश्वर त्यासंभधी शक्ती यावर भर दिला आहे, त्यांचा स्वीकार व अस्वीकार केला आहे, ईश्वरी शक्ती आहे किंवा नाही याच विषयावर मानवास चर्चा करण्यास आणि त्यासंबधी नियम पाळण्यास सांगितले.
परंतु बुद्ध हे ईश्वर या विषयावर चर्चा करणेच व्यर्थ आहे, असे ठामपणे आपणास सांगताना दिसतात आणि स्वतःच्या तर्क बुद्धीवर विश्वास ठेऊन अनुभव आणि चिकित्सा याचे विश्लेषण पर मार्गदर्शन आपणास देताना दिसतात. अंधश्रद्धेस लथाडणाऱ्या सिद्धार्थाची आठवण आधुनिक युगात व्हावी त्यात नवल काय, युद्धा च्या पार्श्वभूमीवर बुद्धाची शांतीमय क्रांती आठवावी यात दुमत तरी कुठले. शोधक बुद्धी आणि अंधश्रद्धा यातील फरक आग या उदाहरणा वरून समजून घेऊयात. आगीचा वापर जीवन सुखासाठी आणि सोयी साठी करता येतो हे शोधक आणि विचारशील बुद्धीतून कळाले, अंधश्रद्धेतून कळते असे नाही. परुंतु आगीचा वापर अंधश्रद्धा पाळण्यासाठी सुद्धा होतो हे सर्व प्रथम बुद्धांनी यज्ञ परंपरेचा विरोध करून लक्षात आणून दिले. आणि ते आज सामान्यपने आपल्या लक्षात येतेय.
यातून तंत्रज्ञान किंवा मानव उपयोगी शोध हे बुद्ध धम्मा शी संपूर्णपणे मेळ खातात असे दिसते. म्हणजेच बुद्धीवादी विचाराने शोध लागतो आणि अंधश्रद्धेने व ईश्वरी विश्वासाने त्या शोधाचा दुरुपयोग होतो हाच अनुभव आपणास दिसून आलेला आहे. म्हणजेच तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी तुम्हाला नैसर्गिक अनुभव आणि शोधक बुद्धी याची कसोटी करावीच लागते आणि याचे अमूल्य मार्गदर्शन बुद्धाने धम्माच्या माध्यमातून केलेले आहे. बुद्धाला अध्यात्मिक गुरू यापुरतेच मर्यादित ठेवणे म्हणजे हा त्यांच्या विषयी आपला जाणून घेण्याचा संकुचित भाव व अज्ञानता आहे. बुद्ध आपणास सामाजिक, राजकीय न्याय आणि कल्याणकारी समाज निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली मार्गदर्शक तत्वे देताना दिसतात ती पाळण्यास शिकवितात आणि त्यांची ही क्षमता बुद्ध विश्वगुरु असल्याचे आम्हा मान्य करण्यास भाग पाडते. आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्देशून सांगतात, “Positively, my social philosophy may be said to be enshrined in three words: Liberty, Equality and Fraternity. Let no one, however, say that I have borrowed my philosophy from the French Revolution. I have not. My philosophy has roots in religion and not in political science. I have derived them from the teachings of my Master, the Buddha…"
अर्थात (थोडक्यात), "सकारात्मकतेने, माझे सामाजिक तत्वज्ञान हे समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तीन तत्त्वाचे सार आहे. कोणीही असे म्हणू नये की ही तत्त्वे मी फ्रेंच क्रांती कडून उसनी घेतली, ही तत्वे मी माझे गुरू बुद्धा कडून घेतलीत." म्हणजेच भारतीय राज्यघटनेला बुद्धाच्या विचाराचा आधार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान भविष्यातील कल्याणकारी विज्ञान विकसित होण्यासाठी बुद्धाचेच मार्गदर्शन प्रभावी ठरेल हे जाणून मान्य केल्याशिवाय मानवी बौद्धिक क्रांतीच्या गतीस सद्गती लाभणार नाही.
बुद्ध पौर्णिमेच्या सर्व मानवजातीस मंगलमय सदीच्छा..
-सिद्धांत राजू नितोने.
अकोला, महाराष्ट्र (भारत).

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment