✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    लॉकडाउन व जातीवाद

    लॉकडाउन व जातीवाद.

    पुरोगामी महाराष्ट्रमध्ये जर सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा मागास किंवा दलित समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर ते लांच्छनास्पद आणि लाजिरवाणी बाब आहे , कारण  महाविकास आघाडीत काम करणारे नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते ऊठसूट छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू ,आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण आणि समाजकारण करत असतात .जर असे असेल तर या पक्षासोबत काम करणाऱ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी , समाज घटकांनी आणि तथाकथित विचारवंतांनी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे, कारण जातीयवादी प्रकरने फक्त बीजेपीच्या राज्यात घडत होते असे नाही , तर प्रस्थापित पक्षांच्या विचारात व जाणिवेत सामंतशाही व वर्चस्ववादी भूमिका असेल तर सामाजिक न्याय येणार कुठून ???

    गेले काही दिवस महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाल्यानंतर अनेक जातीवाद आणि अन्याय अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत , ज्यात बीड जिल्ह्यातील पारधी हत्याकांड , अरविंद बनसोडे प्रकरण , खंडू साळवे वर झालेला हल्ला , भीमराव गायकवाड प्रकरण हे सर्व पाहता जातीवाद लोक कोरोना आणि लॉकडाउन ही मागास व दलित विरोधी काम करण्याची संधी म्हणून पाहतात ??? असा प्रश्न निर्माण होतो .
    कारण मागील काही दिवसात रिपोर्ट झालेल्या या घटना आहेत , या मध्ये ज्या केसेस रिपोर्ट झाल्या नसतील तर त्याची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बर . जर एखाद्या जातीवाद प्रकरणात कोणत्याही मंत्र्यांचे संबंध जोडला जात असेल , तर त्या संबंधित मंत्र्यांची नैतिक जबाबदारी बनते की अशा प्रकरणामध्ये पुढे येऊन खुलासा केला पाहिजे , नाहीतर समाज म्हणून संशयाची सुई त्यांच्याकडे जाऊ शकते नाही ???

    महाराष्ट्र शासनाने या सर्व प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधीत जबाबदार लोकांवर कायदेशीर कारवाई करावी , तसेच यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांना ही सहआरोपी म्हणून दोषी धरण्यात यावे , कारण कोणाचा वरदहस्त असल्याशिवाय कोणी अशी हिम्मत करत नाही , जर हे सरकार सर्व सामान्य जनतेचे , गरीब , आदिवासी , मागासवर्ग , शेतकरी , कामगार , कष्टकरी यांचे प्रतिनिधित्व करणारे असेल , तर त्यांनी आपल्या कृतीतून महाराष्ट्राला आश्वाशीत करावे , जेणेकरून जनतेला संदेश जाईल हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले , शाहू महाराज , डॉ.आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचा विचारांवर आणि वारसा लाभलेले सरकार आहे  , तर त्यांनी महाराष्ट्र मध्ये समान न्याय व सामाजिक न्याय याची बीज खालपर्यंत रुजवली तर जनतेचे विश्वास निर्माण होईल , अन्यथा सर्व एकाच मालेचे मणी ही म्हणण्याची वेळ जनतेवर येऊ नये.

    सुनील शिरीकर
    (टीप :- लेखकांनी वरील सध्या महाराष्ट्र मध्ये घडणाऱ्या गोष्टींचे वर्णन केले,वरील लेखाशी आंबेडकर मोव्हमेंट टीम सहमत असेल असे नाही,) 
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: