✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    "बुध्द धम्म भारतातू पतन होण्याची कारणे "

     "बुध्द धम्म भारतातू पतन होण्याची कारणे "


    सम्राट अशोक यांच्या काळात प्रमुख असलेला बुध्द धम्म लयास जाण्यास दोन कारणे कारणीभूत ठरली. 

    एक प्रमुख कारण होते स्वतः "संघ " व दुसरे होते परकीय आक्रमणे.

    सम्राट अशोक यांच्या काळात सर्व  जनता ( 98%) ही धम्म मानणारी  होती, तर उर्वरित जनता ही जैन व ईतर विचारांना मानत असत. 

    एकुण 62 पंथ(बुध्दांच्या काळी) किंवा विचार धारा त्या काळी होत्या. 

    बुध्द धम्म लयास जाण्यास प्रमुख कारण ठरले ते म्हणजे "संघ" व आपसातील बेबनाव पणा. बुध्दांनी सांगितलेले शिल न पालन  करणे व त्याच्यात शिथिलता आणून एकुण 18 पंथ बुध्द धम्मचे झाले होते.

    शिल मार्गाचा अवलंबन व धम्माचा प्रचार प्रसार न करता कर्मकांड ,तंत्र मंत्र व लोक समुहा पासून आचार विचारां पासुन दूर  जाणे ही संघाला व धम्माला फार हानिकारक ठरले, त्यामुळे लोक आश्रय व राज आश्रय दोन्ही गेले.यातच मौर्य वंशाचे शेवटचे साम्राट यांची त्यांच्या सेनापती शुंगाने केलेली हत्या हे फार मोठे  नुकसान ठरले.

    दुसरे कारण होते परकीय  आक्रमणे,  12/13 व्या शतका भारतात परकीय आक्रमणे वाढली होती त्याचा पहिला तडाखा बसला तो संघालाच, एक सारखे चिवर घातलेले भिखु संघ सैनिक असल्याचे भास होवून त्यांची अतोनात हाल करत कत्तली करण्यात आल्या व विद्यापीठांना आगी लावल्या गेल्या़. सहाव्या शतकातील मिहीरकुल राजा हा बौध्दांचा छळ करण्यात अग्रसेर होता , तर 25 वर्षे शुंग राज्य स्थापित करणार हा ही काही छळ करण्यात कमी नव्हता तसेच बंगाल चा राजा "शशांक" याने तर गया येथील पिंपळाच्या झाडाला तोडू मुळे सुद्धा जाळून टाकीत धम्माची फार मोठी हानी केली.



    तरी काही ठिकाणी भारतात बुध्द धम्म आपल्या शुद्ध स्वरुपात भिखु संघा मार्फत पुन्हा प्रस्थापित करण्यात आला व टिकून राहीला. 15 व्या शतका पर्यंत "कान्हेरी लेणी" इथे अध्यापन देण्याचे काम भिखू संघा मार्फत चालू होते अशा नोंदी आपल्याला सापडतात.

    सुरज रतन जगताप, घणसोली, नवी मुंबई. 29/10/17

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: