✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    बर्दापूर : आरोपीला अटक ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत अधिकाऱ्यांकडून आज अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 सुधारित 2016 अन्वये म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे आज गुन्हा दाखल होण्याबाबत आश्वासित करण्यात आलेले आहे.


    दिनांक 28 ऑक्टोबर रोजी विटंबना झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी आवश्यक ते गुन्हे दाखल केले नव्हते या बाबत रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते. या संदर्भामध्ये योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करावा यासाठी पोलीस अधीक्षक व इतर संबंधितांशी कालपासून संवाद सुरू होता. तसेच या प्रश्नावर रिपब्लिकन युवा मोर्चाच्या मराठवाडा शाखेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्या सोबत 2 नोव्हेंबर रोजी जिल्हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध तसेच पोलीस अधीक्षक यांच्याही विरुद्ध जबाब दो आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आली होते. 



    अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणार असल्याने या संदर्भामध्ये तपासाला गती मिळणार आहे तसेच यातील आरोपींना कायद्यान्वये कठोर शिक्षा करण्यास मदत होणार आहे. यामुळे अशा प्रकारचे पुतळा विटंबना करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वृत्तींना चांगलाच धडा शिकवता येईल त्यामुळे रिपब्लिकन युवा मोर्चा यांनी तसा आग्रह धरला होता.


    दरम्यान सामान्य जनतेची अनुयायांची भावना कायमच  संघर्षाची आंदोलनाची निषेधाची व आक्रोश व्यक्त करून न्याय पदरात पाडून घेण्याची असते व ती योग्य देखील आहे. परंतु संघटना प्रमुख राजकीय कार्यकर्ते अथवा जबाबदार प्रतिनिधी म्हणवणाऱ्यांनी अशा वेळेला योग्य पद्धतीने आंदोलनाला दिशा देणे, योग्य मागणी ठेवणे ही बाब अत्यावश्यक असते. महापुरुषांच्या संदर्भामध्ये स्पष्टपणाने तरतुदी असताना देखील त्यानुसार गुन्हा दाखल न होणे हे आपल्याला देखील अंतर्मुख करायला लावणारे आहे.

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: