✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    वंचितच्या 'ऑनलाईन युवा आघाडी' नोंदणीस प्रचंड प्रतिसाद !

    मुंबई : वंचित बहुजन आघाडीची युवा राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.  याच्या अध्यक्षतेपदी निलेश विश्वकर्मा तर महासचिव पदी राजेंद्र पातोडे यांची नियुक्ती करण्यात आली.

    राज्याच्या प्रदेश कार्यकारिणीच्या नियुक्तीनंतर ''राज्यभर ऑनलाईन सदस्य नोंदणी" अभियान राबविण्यात येत आहे.  यामध्ये 5 हजारच्या वर युवक-युवतींनी नाव नोंदणी केली आहे. अजूनही नाव नोंदणी सुरू असून  तरुण तरुणींचा ओढा अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे सुरू आहे. 



    वंचितमध्ये कुठल्याही घराणेशाहीला थारा नसून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत असून राजकीय दृष्ट्या सक्रिय तरुण तरुणींचा कल वंचितकडे असल्याचं दिसून येतय. 

    याविषयी युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्याशी प्रबुद्ध भारताने संपर्क केल्यावर ते म्हणाले की, वंचितमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील युवक युवतीला न्याय मिळू शकतो. वंचित ही ज्या समूहांना राजकिय मंच नाही, ज्यांना जाती, धर्मावरून वंचित ठेवण्यात आले आहे अशा लोकांचा हा प्लॅटफॉर्म आहे.इथे घराणेशाहीला नाही तर गुणांना आणि व्यक्तीला प्राधान्य दिले जाते.


    नाव नोंदवण्याची लिंक - 


    https://forms.gle/ntCWyoWMrenFxp697

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: