✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    ॲक्ट्रासिटी ॲक्टची अंमल बजावणी कडक हवी।

     

             जातीपातीच्या भयंकर कॅन्सर सारख्या घाण ऊकिरड्याला भारतीय जनतेने उद्ध्वस्त करण्यासाठी 65 ते 70 वर्षे लोटली तरी हा उकिरडा साफ होता होत नाही तर याचा अर्थ कायॽ माझ्या मते याचा अर्थ असा आहे की तो कायदा ज्याप्रकारे कठोर आहे त्या प्रकारे त्याची अंमलबजावणी सुद्धा तीतक्याच कठोर प्रकारे होत नाही तोपर्यंत यशाची अपेक्षा निरर्थक आहे ते म्हणतात ना एखाद्या दुर्धर आजारावर जसा जहाल उपाय करावा लागतो तरच काही फलित हाती लागू शकते मात्र हा तशातला प्रकार होत नसल्यामुळे आणि उलट प्रशासनातून चाललेली  लिपापोती या भयंकर बिमारीला देशात स्टे देताना दिसते आहे त्याचाच परिपाक की भारतासारख्या देशात आजही समतावादी लोकांना देशातील निवडणुकीमध्ये जातीच्या उल्लेखाने उमेदवारांची ओळख करून देणे भाग पडत आहे याचा अर्थ जातीविहीन समाज व्यवस्थेसाठी उलट त्यांना जातीचाच आधार घ्यावा लागत आहे ही या देशाची फार मोठी शोकांतिका झाली आहे या भारत देशात जातीद्वेषाच विष माणसा माणसाच्या नसोनसी मुरलेलं असून सारा भारतीय समाज त्यां विषाने पिडलेला आहे एक जात दुसऱ्या जातीचा इतका द्वेष करते की इथे पुंजूकेचे पुंजके जातीच्या घाणीचे ठीक ठिकाणी वाड्याच्या नावा रुपाने उभे करण्यात आले आहेत .



    उदाहरणार्थ मांगवाडा चांभारवाडा पाटील वाडा देशमुख वाडा ब्राह्मणवाडा इ त्यादीआणि हे वाडे जोपर्यंत एकजिन्सी होय त्याचा एक समाज बनत नाही तोपर्यंत जाती जमाती प्रतिबंधक कायदा जेवढ्या जोरकसपणे अमलात आणता येईल तेवढा आणावा लागेल मात्र येथे शासन आणि प्रशासन जातीपातीलाच जर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पोषक तत्व पुरतील तर भारता तुझं भविष्य कायॽ हा प्रश्न अनुत्तरितच  राहणार काल-परवा ज्युडीशियल सिस्टीम च्या चर्चेतून जेव्हा या कायद्याचा फेर विचार अथवा सुधारण्याची अपेक्षा व्यक्त झाली तेव्हा या उच्च शिक्षितांनी अर्थात कायद्याच्या अभ्यासकांनी भारतीय सामाजिक परिस्थितीला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही कारण त्यांची मानसिकता सुद्धा जातिव्यवस्थेने अतिशय दगडासारखी कठीण करून ठेवलेली दिसते मला वाटते ज्या उच्चभ्रु जातीने स्वतःच्या स्वार्थासाठी मानवी समाजाचे सहा-सात हजार तुकडे करून ठेवले ते तुकडे आता जोपर्यंत हेच उच्चभ्रु लोकांचे वारस जोडण्याचा प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत या देशाचं भविष्य टांगणीला आहे त्यामुळे हे सगळे परिवर्तन घडवण्यासाठी भारतीय समाजातील बहुजनांनी तळहाती शिर घेऊन लढण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे यातच बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे अन्यथा जात जात नाही तोपर्यंत जाती जाती श्रेष्ठत्वाचा विषारीफणा हा भारतीय समाजाचा बिनदिक्कतपणे बळी घेत राहील त्यामुळे हक्क-अधिकार यापेक्षा कर्तव्याची जाणीव ठेवून कामाला लागाल ही अपेक्षा बाळगून या कायद्याची अंमलबजावणी खरंच कठोर व्हायला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो

    जय भीम जय भारत

    जीवन बोदडे भांबेरी

     मो,न,९६८९२६८६२०

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: