माता रमाई यांच्यावर आलेला पहिलाच भाषणाचा प्रसंग मोठ्या चातुर्याने हाताळला.| बाबसाहेबांबरोबर रामामातेच दर्शन घडले,भाषण,ऐकलं आमच्या जीवनाच आज सोन झालं.
अखिल भारतीय पददलितांचे उद्धारक परमपूज्य भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या रमाई या पत्नी . भारतीय दीनदलितांच्या अभ्युदयासाठी , उन्नतीसाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले . अनेक हालअपेष्टा भोगल्या . अनेक अपमान , अवमान सहन केले . अनेकदा त्यांच्यावर प्राणघातक संकटेही आली , हे आपणा सर्वांना माहीत आहेच ! तथापि त्यांच्या प्रथम पत्नी रमाबाई ( ऊर्फ रामू व भागीरथी ) यांनीही बाबासाहेब आंबेडकरांकरिता अनेक कष्ट सहन केले , अनेक यातना भोगल्या , अनेक उपासतापास केले .
![]() |
| त्यागमूर्ती माता रमाई |
डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे विलायतेहून ‘ राउंड टेबल कॉन्फरन्स'हून १ ९ ३२ साली , साऱ्या जगाला चकित करून , अस्पृश्यांच्या माणुसकीच्या हक्काचा झगडा पेटवून , यशस्वी करून मुंबईस परतले होते . अर्थात त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे चाहते , इष्टमित्र , नातेवाईक व हजारो अनुयायी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते . या प्रचंड जनसमुदायात माता रमाबाईही नसत्या तर नवलच घडले असते ! का की , रमाईची बाबासाहेबांबद्दलची भावनाच तशी जाज्ज्वल्य होती .
बाबासाहेब बोटीतून धक्क्यावर उतरताच जनसागराच्या ' आंबेडकरांचा विजय असो ! आंबेडकर कौन है , दलितोंका राजा है । आंबेडकर झिंदाबाद ' इ . घोषणांनी परिसर दणाणून गेला . बाबासाहेबांच्या गळ्यात एकामागून एक हार पडत होते आणि ते नेत्रदीपक दृश्य पाहून माता रमाईचे हृदय उचंबळून येत होते आणि डोळ्यांत आनंदाश्रू येत होते . आणि हे दृश्य , बाबासाहेबांचे जे अनेक सवर्ण स्नेही , पाठीराखे होते त्यांतील एकाने ( जनता पत्राचे संपादक सहस्रबुद्धे यांनी ) अचूक टिपले होते . कारण सर्वांचे शेवटी माता रमाबाईंनी बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला होता . परंतु हार घालताना सर्वांची दृष्टी बाबासाहेबांच्या मुखाकडे होते , तर रमाईंची दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडे . हारतुऱ्यांचा कार्यक्रम झाल्यावर तेथे छोटीशी सभा झाली अन् सहस्रबुद्धे यांनी रमामातेस दोन शब्द बोलण्यास व या भाषणात बाबांना हार घालताना दृष्टी बाबांच्या मुखाकडे न वळविता पायाकडेच का वळविली होती त्याचे स्पष्टीकरणही करावयास ( गंमतीने ) सुचविले .
माता रमाईंना यापूर्वी अशा सभेत भाषणे करण्याची सवय नव्हती . ( एकदा केले होते . ) त्यामुळे त्या क्षणभर गडबडल्याच ! बोलावं अन् ते चांगलं न वठलं तर ? आणि न बोलावं तरी पंचाईतच , अशी द्विधा अवस्था झाली . पण तो प्रसंग या थोर “ अध्यक्ष महाराज , दलितांचे बाबा व मातेनं मोठ्या चातुर्यानं हाताळला . त्या म्हणाल्या , माझे थोर पती आणि माझ्या सर्व लहानथोर बंधुभगिनींनो , सहस्रबुद्धे साहेबांनी माझ्यापुढे दोन प्रश्न ठेवलेत- ( १ ) सर्वांच्या शेवटी मी बाबासाहेबांना हार का घातला व ( २ ) त्यावेळी माझी दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडेच का होती ? त्यांचे उत्तर मी देत आहे . चुकलंमाकलं तर क्षमा कराल अशी आशा आहे . पहिल्या प्रश्नाचं उत्तर असे आहे की , ज्यांना ज्यांना बाबासाहेबांचं दर्शन कधीकाळी होत असतं त्यांनाच मी प्रथम संधी देणं हे माझं कर्तव्य होतं . ते माणुसकीचंही आणि सौजन्याचंही होतं . तेव्हा मी सर्वांना संधी दिली व मग मी हार घातला . आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं - आपणास माहीत आहेच की , बाबासाहेबांनी साऱ्या दीनदलितांचं , गोरगरिबांच्या उद्धाराचं कंकण बांधलं आहे व मी त्यांची धर्मपली आहे . त्या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या पायांकडं नजर वळवली . माझ्या या उत्तरानं सहस्रबुद्धे साहेबांचं समाधान झालं असेल असं मला वाटतं . ' आणि माता रमाबाईंनी आपले हे छोटे भाषण संपवले, हे संपताच - आंबेडकर झिंदाबाद , आंबेडकर कौन है इ . घोषणांनी जनसागरातून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट वातावरण दुमदुमून गेले .
संकलन : - अडमीन टीम
संदर्भ :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात:"असा मी जगलो"


Leave Comments
Post a Comment