✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    मुंबई विद्यापीठात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र

     मुंबई विद्यापीठात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र

    ---------------------------------------------


    मुंबई विद्यापीठात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी ऑनलाईन करण्यात आले. जगाला दिशा देणारा महामानव आपल्या देशात, आपल्या राज्यात झाला ही खरोखर अभिमानाची बाब आहे, अशी भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

    या आॅनलाईन कार्यक्रमात खासदार शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

    यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, हे संशोधन केंद्र लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमीशी संलग्न असेल, तसेच ते कोलंबिया विद्यापीठाशीही संलग्न झाले पाहिजे. बाबासाहेबांचे कार्य आणि त्यांचे विचार यापुढील काळातही सर्वांना दिशादर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



    शरद पवार म्हणाले की, संविधान निर्मीतीसोबच धरणांची उभारणी, विद्युत निर्मिती, कामगारांचे अधिकार अशा विविध क्षेत्रांत फार महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांची वैज्ञानिक दृष्टी देशाला आणि समाजाला महत्त्वपूर्ण दिशा देणारी ठरली. ज्या विद्यापीठात बाबासाहेबांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात आज त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभे राहात आहे. त्यांचे कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, आनंदराज आंबेडकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.



    (सौजन्य: लोकमत न्यूज नेटवर्क)

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: