✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि विकसित भारत

     डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि  विकसित भारत 


    आजच्या आपल्या भारताच्या सर्वांगीण विकासाचे मूळ आपणाला आपल्या म्हणजेच भारताच्या संविधानाच्या एक एका कलमात दडलेले दिसेल. आपले संविधान म्हणजेच आपल्या विकसित भारताच्या जडणघडणीचा सुलभ असा महामार्गच आहे. आपले माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी  २०२० पर्यंत आपला भारत विकसित राष्ट्र होईल असे स्वप्न पाहिले, परंतु १९५० पासून आजपर्यंत आपल्या राज्यकर्त्यांनी भारतीय संविधानाची जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काटेकोरपणे अंमलबजावणी केली असती तर कदाचित आपणाला २०२० पर्यंत आपल्या भारताची विकसित राष्ट्र होण्याची वाट पाहावी लागली नसती. 



    आता तरी आपण भारतीय संविधानाची जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अंमलबजावणी केली तर नक्कीच येत्या काही वर्षात आपला भारत हा विकसित राष्ट्र होईल. आज आपण अभ्यासले तर आपल्या भारताचा जो आजपर्यंत विकास झालेला आहे, तो राज्यघटनेच्या वेगवेगळ्या कलामांद्वारे व्यक्तीला दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या आधारामुळे असे दिसेल.

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: