चाणक्य -एक काल्पनिक पात्र -Ambedkar Movement
चाणक्य -एक काल्पनिक पात्र
सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांना सम्राट बनवण्यामागे चाणक्य चा सिंहाचा वाटा होता असे आपल्याला सांगितले जाते, चाणक्यचा जो पेहराव आणि वर्णन सांगितले जाते,त्यावरून तो एक ब्राह्मण होता असे आपल्याला दिसते.
पण सम्राट चंद्रगुप्त यांना घडवण्याचे श्रेय खरच चाणक्य या जाते का ? की आपल्याला सोईस्कर इतिहास सांगितला जातो ? आपल्याला सेल्यूकस निकेटर माहिती आहे का ? सेल्यूकस निकेटर हा अलेक्झांडर द ग्रेट(सिकंदर) चा सेनापती होता, सिंकदरच्या मृत्यूनंतर तो ग्रीकच्या एका भूभागाचा राजा झाला, त्याने सम्राट चंद्रगुप्ताच्या राज्यावर आक्रमक करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न सम्राट चंद्रगुप्ताने हाणून पाडला, मग दोघांमधे तह झाला, त्या तहानुसार सेल्यूकस ने सम्राट चंद्रगुप्ताचे अधिपत्य आणि काही शर्थी मान्य केल्या, त्या शर्थीनुसार सम्राट चंद्रगुप्ताने सेल्यूकसची मुलगी हेलेना सोबत लग्न केले.
आपल्याला मेगस्थनीस माहिती आहे का.? तर मेगस्थनीस हा सेल्यूकसचा वकील , तो चंद्रगुप्ताच्या यांच्या दरबारामधे ई.स.पूर्व ३०४ ते ई.स.पूर्व २९९ या काळात राजदूत होता, तो मुळचा युनानी होता.
आता इथे चाणक्य ची पोलखोल होते, चाणक्य हा सम्राट चंद्रगुप्तचा अमात्य होता असे सांगितले जाते आणि त्याच चंद्रगुप्तच्या दरबारात मेगस्थनीस काही वर्ष राजदूत होता,
त्या काळात मेगस्थनीसने सम्राट चंद्रगुप्तचे जे राज्य अनुभवले, पाहिले त्याचे वर्णन त्याने आपल्या #इंडिका या ऐतिहासिक ग्रंथात केले, या ग्रंथात मेगस्थनीसने राजकीय, सामाजिक, आर्थिक बाबींचा उल्लेख तर केलाच आहे ,सोबतच भारतीयांच्या शरीरयष्टी, खानपानापासून ते भारतातील ७ व्यवसायीक वर्ण, चंद्रगुप्तचा राजकारभार, महाल इतपत वर्णन अगदी बारकाईने केले आहे,
मजेशीर गोष्ट ही की हे सगळे वर्णन करतांना मेगस्थनीसने चाणक्यचा आपल्या इंडिका या ऐतिहासिक ग्रंथात एका छोट्या टिंबा● इतका सुद्धा उल्लेख केलेला नाही,
काल्पनिक इतिहास सांगणाऱ्यांनुसार आणि वास्तव इतिहास नुसार चाणक्य आणि मेगस्थनीस हे समकालीन आहेत, मग मेगस्थनीसने त्याकाळच्या संपूर्ण भारताचे वर्णन इंडिका मधे केले पण त्याला त्याच दरबारात समकालीन असणाऱ्या चाणक्यचा साधा उल्लेखही केला नाही,
यावरून हे सिद्ध होते की चाणक्य हा काल्पनिक पात्र आहे, जातीचा मोठेपणा दाखवण्यासाठी चाणक्य या काल्पनिक पात्राला इतिहासात घुसडवले जाते, सम्राट चंद्रगुप्ताचे महत्त्व कमी करण्याचा हा खोडसाळ प्रकार आहे.
अमोल बोर्डे
औरंगाबाद

Leave Comments
Post a Comment