✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

     *🔹 शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य.*🔹

             "तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा'या न्यायाने आता आपण स्वतःलाच आपल्यातील कमीपणा घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतरांनी मदत केली नाही तरी आपली सुधारणा आपणच केली पाहिजे आणि आपण अशा रीतीने सुधारलो तर इतरांना आपणाला दोषी ठरविता येणार नाही. आपला कलंक आपणच काढला पाहिजे. समजा आपल्यातले लोक शिकले, ऑफिसर झाले तर इतरांना त्यांच्या हाताखाली काम करावेच लागणार व त्यांना मान द्यावाच लागणार. आपली व त्यांची स्थिती एक झाल्यावर आपल्याला ते कमी लेखनारच नाहीत.


             प्रत्येक माणसाची काया, वाचा व मने अशी त्रिशुद्धी झाली पाहिजे. अशा रीतीने पवित्र झालेल्या माणसाला अपवित्र कोण म्हणणार? त्यांच्यापेक्षा तुमचे कपडे डौलदार असल्यावर तुम्हाला कोण कमी लेखणार? आमच्या उन्नतीचा प्रयत्न आता आम्हालाच करावयास पाहिजे."!!!

    🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    (संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-३, पान नं. ३५९)

    .

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: