✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    मी स्वेट मार्डेन बोलतोय

     मी स्वेट मार्डेन बोलतोय


    युवकांनो नशीबावर रडणारे नाही,
    उभे राहून लढण्या तयार व्हा
    अडचणींच्या आगीत सुलाखून
    भवितव्य घडवण्या तयार व्हा

    कोणी देव म्हणो, कोणी दैव
    तुम्ही कर्मालाच देव माना
    भविष्यही घडेल, उजळेल आयुश्य
    प्रयत्नाने घामाचे पाणी घाला स्वप्नांना

    हार म्हणजे शेवट नाही,
    ती तर पुढची पायरी आहे
    अपयशातून यषाचे दार उघडणारी
    ती तर नवी कोरी संधी आहे.




    कोणी दिशा दिली नाही तरी,
    मार्ग तुम्हीच शोधावा
    अंधार कितीही दाट असो,
    आपुलाची दिप आपण व्हावा

    तुमच्याच हातात आहेत वेळेची सूत्रं,
    मनात जिद्दीची ज्वाला तेवत ठेवा
    नशीब नाहीच तुमचं शस्त्र,
    मेहनतीला तुमची ताकद बनवा

    उठा उठा तरुणांनो,
    वेळ आली इतिहास बदलाची
    नशीब नाहीच म्हणण्याची
    आणि प्रयत्नवादी होण्याची! 
    आणि प्रयत्नवादी होण्याची!

                                - प्रिया कदम 

    नशीब नाहीच, प्रयत्नवादी व्हा नावाच्या पुस्तकात स्वेट मार्डेन या तत्ववेत्ता चा लेख वाचनात आला. तो तरुणांना संदेश देतोय त्या लेखात व त्यावरून ही कविता मला सुचली 🙏

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: