✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना ना. रामदास आठवले यांची तत्काळ मदत

     समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना ना. रामदास आठवले यांची तत्काळ मदत

    रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे आज शिर्डी ते मुंबई प्रवास करत असताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.


    लॉरीने टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले होते. अपघाताची घटना पाहताच ना. रामदास आठवले यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून अपघातस्थळी भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली.

    तसेच पोलिसांना व रुग्णवाहिकेला तातडीने माहिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आपल्या ताफ्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी व अपघाताच्या चौकशीसाठी घटनास्थळी थांबवून जखमींना आवश्यक मदत मिळवून दिल्यानंतर ना. रामदास आठवले मुंबईकडे पुढील प्रवासासाठी रवाना झाले.


    यावेळी ना. रामदास आठवले यांच्या समवेत काकासाहेब खंबाळकर, सिद्धार्थ कासारे आणि श्रीकांत भालेराव उपस्थित होते.


    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: