✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारली; महापालिका/प्रशासनाचे आयुक्त वादाच्या भोवऱ्यात. ?

     आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे BMC कामगारांच्या महत्त्वपूर्ण समस्या सोडवण्यासाठी, तसेच कामगारांच्या महत्त्वपूर्ण मागण्या संदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार होते. 


    कामगारांच्या प्रश्नांच्या संदर्भातील ही भेट कुठलेही कारण न देता, कामगारांच्या समस्यांवर पळ काढणाऱ्या मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट नाकारली.



    बाळासाहेब आंबेडकर हे बीएमसीमधील सर्वात पहिली कामगार संघटना जिची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे त्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे अध्यक्ष आहेत.



    भेट नाकारल्यामुळे कामगारांच्या समस्या एकजुटीने मांडणाऱ्या कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बीएमसी आयुक्तांच्या बेजबाबदारपणाचा निषेध करत मुंबई महानगरपालिका आयुक्तालयासमोर कामगारांनी, मुंबई म्युनिसिपल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.


    सतिश राजगुरू

    महासचिव मुंबई प्रदेश वंचित बहुजन आघाडी 

    महासचिव, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: