✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगाचे आदर्श

     भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशातील दिन दलित पददलित यांच्या साठी लढा दिला.सर्व दलित पददलितांना सन्मानाने जगण्याचा मार्ग खुला केला नव्हे  सन्मानाने आज भारतातील दिन दलित आपले जीवन जगत आहेत. परंतु  या साठी अतिशय खडतर असा प्रवास त्यांना करावा लागला अगदी बालपणा  पासून त्यांना संघर्षमय जीवन जगावे लागले. त्यांच्या बालपणातील विद्यार्थी दशेतील हा प्रसंग कोणत्याही सहृदयी माणसाच्या हृदयाला पाझर फोडल्या शिवाय राहणार नाही.

    एके दिवशी वर्गा मध्ये गुरूजी शिकवित असतांनाच गुरुजींनी सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला कि अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला दिसते आहे परंतु तुम्ही तिला स्पर्श करू शकत नाही. तेंव्हा एका विद्यार्थ्याने हात वर केला, गुरूजी म्हणाले सांग अशी कोणती गोष्ट आहे की जी तुला दिसते परंतु तु स्पर्श करू शकत नाही तेंव्हा तो विद्यार्थी म्हणाला ते आकाश मला इथुन दिसते आहे पण मी स्पर्श करू शकत नाही,दुसरा विद्यार्थी म्हणाला तो झाडाचा शेंडा मला खिडकीतुन दिसत आहे परंतु मी स्पर्श करू शकत नाही, तिसरा विद्यार्थी म्हणाला हे वर्गाचे छत गुरूजी मला दिसत आहे पण मी‌‌ स्पर्श करू शकत नाही. अस्पृश्यते मुळे वर्गा बाहेर बसलेल्या छोट्या भीमारावाने हात वर केला गुरूजी म्हणाले सांग भीमराव अशी कोणती गोष्ट आहे जी तुला डोळ्यांनी दिसत आहे परंतु तू स्पर्श करू शकत नाहिस? छोटा भिमराव म्हणाला गुरुजी तो फळ्या जवळ ठेवलेला पाण्याचा माठ मला इथून दिसत आहे मला तहान लागली आहे, परंतु  मी त्या माठाला स्पर्श करू शकत नाही.पाणी सुध्दा ज्या विद्यार्थ्याला पिऊ देत नव्हते 

    असा हा भारत देशातील विद्यार्थ्यी सारे अत्याचार पचवून जगा मध्ये  एक विद्वान विद्यार्थी म्हणून जग प्रसिद्ध होतो, "सिम्बॉल ऑफ नॉलेज" "ज्ञानाचे प्रतिक" म्हणून जगाने या विद्यार्थ्याचा गौरव केला आहे.

    जगातील प्रत्येक देशामध्ये या भारतीय विद्यार्थ्याचे पुतळे उभारले गेले आहेत.कोलंबिया विद्यापीठ,जपान,लंडन,थायलंड, अमेरिका. कॅनडा,इ.जेंव्हा या लोकांना विचारण्यात आले की भारतातील या विद्यार्थ्याचे पुतळे तुम्ही का उभे केले आहेत ?तेंव्हा कोलंबिया विद्यापीठातून सांगण्यात आले की आम्ही आमच्या विद्यापीठा समोर भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभे करण्याचे कारण हे आहे की, "आज पर्यंत भारतातून आलेल्या  आणि कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांचा शिक्षणाचा रेकॉर्ड एकाही विद्यार्थ्यांने तोडलेला नाही.मग अशा या विद्वान विद्यार्थ्याचा आदर्श आमच्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या नवीन विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा आणि त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावे या साठी आम्ही  कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारा जवळ भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला आहे. प्रत्येक भारतीयाची मान स्वाभिमानाने ताठ झाल्या शिवाय रहाणार नाही. जगातील इतर सर्वच देशातील प्रत्येकाचे‌ हेच म्हणणे आहे की आमच्या देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन शिक्षणाची वाटचाल करावी जेणे करून तो विद्यार्थी नक्कीच यशस्वी विद्यार्थी होईल.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील असाच एक प्रसंग छत्रपती शाहू महाराज एकदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अचानक भेटायला आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर  डबक चाळीतील लहानश्या एका खोली मध्ये आपल्या परिवारा सह रहात होते. छत्रपती शाहू महाराजांना पाहून डॉ.बाबासाहेबांना आश्चर्य वाटले ते विनम्रपणे छत्रपती शाहू महाराजांना म्हणाले, महाराज आपण राजे आहात,आपण येथे‌ मला भेटायला येण्या ऐवजी आपल्या कडे मला बोलावून‌ घ्यायचे होते.मी आलो असतो.आपण राजे आहात. तेंव्हा शाहु महाराज त्यांना‌ म्हणाले‌ मी परंपरेने झालेलो राजा आहे,मी आज राजा आहे परंतु मी ऊद्या राजा असेनच असे नाही आपण जनतेच्या हृदयातले कायमचे राजे आहात. आज छत्रपती शाहु महाराजांचे शब्द जसेच्या तसे खरे ठरले आहेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासपुर्ण तयार केलेल्या संविधानामुळे आज केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगातील प्रत्येकाच्या हृदयातले डॉ.बाबासाहेब आंबेडकर राजे झाले. 

    "सिम्बॉल ऑफ नॉलेज" ज्ञानाचे प्रतिक म्हणून संपूर्ण जग,जगातील विद्यार्थी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून स्फुर्ती घेत आहेत.



    जगातील असे पहिले विद्वान डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत की केवळ आपल्या वाचनाच्या ध्यासा साठी त्यांनी दादर येथील हिंदू कॉलनी मध्ये राजगृह नावाचा बंगला बांधला ज्या मध्ये बसुन अठरा अठरा तास डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचन करीत असत. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि मराठा वृत्तपत्राचे संपादक आचार्य अत्रे यांनी आपल्या आग्रलेखा मध्ये लिहिले होते की जर तुम्हाला  एक ज्ञान तपस्वी पहायचा असेल आणि त्यांचे स्वच्छ अद्ययावत ग्रंथालय पहावयाचे असेल तर हिन्दू कॉलनी मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या "राजगृहातील ग्रंथालयाला भेट द्या.एखाद्या ब्राम्हणाला देखील लाजवेल असे‌ स्वच्छ आणि प्रशस्त ग्रंथालय आपल्याला पहायला मिळेल.ग्रंथावर जीवापाड प्रेम करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे म्हणूनच  सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचे प्रतिक म्हणून जगाने त्यांना पदवी बहाल केली आहे.

    म्हणून प्रत्येक भारतीयाला सांगावेसे वाटते आपल्या मुला मुलींना घडविताना त्यांना आवर्जुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हिंदू कॉलनी मधील बंगला दाखवा.भारत देशात  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे एक विद्वान कसे घडले याची गोष्ट सांगा, तरच आपली मुलं त्यांचा आदर्श घेऊन भविष्यात या भारत देशा मध्ये चांगले विद्वान नागरीक म्हणून घडतील.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग अतिशय महत्वाचा आहे, परंतु माणसे असुनही माणुस म्हणूनया देशात  ज्यांना मानले जात नव्हते अशा दिन दलितांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून शिक्षणा बरोबरच त्यांच्या अमुलाग्र बदल करणारी एक ऐतिहासिक घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांच्या सम्मतीने केली‌ ती म्हणजे आपल्या लाखो अनुयायां सह १४ ऑक्टोबर१९५६ रोजी बौद्ध धम्माची नागपुर येथे दिक्षा घेतली, आणि शास्त्र शुद्ध धम्म दिला.ज्या मुळे आज तीच दिन दलित पददलित माणसं स्वाभिमानाने आपले जीवन बौध्द म्हणून जगत आहेत. या पेक्षा माणूस घडविण्याची जगात दुसरी  कोणती मोठी क्रांती असु शकते. म्हणूनच आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जगाने आपल्या डोक्यात आणि हृदयात स्थान दिले आहे याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे.


    *प्रा.डॉ.संजय हिराजी खैरे*

       नालासोपारा (पुर्व )

      7219869437

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: