तुमच्या डोक्यातील राजे महाराज नावाचे आरक्षण आधी बंद करा?

तुमच्या डोक्यातील राजे महाराज नावाचे आरक्षण आधी बंद करा?
      -- अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे

मी क्लासेस घेण्यास तयार आहे ते देखील मोफत मध्ये, स्वयंघोषित राजे असो किंवा अजून कोणी, पण छत्रपती शाहू महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही त्यांचे वंशज असले तरी.
आरक्षण गेले खड्ड्यात....
हे बोलण्यापेक्षा जातीयव्यवस्था नाहीशी झाली पाहिजे हे बोलायला जीभ लुळी झाली होते का?
ज्याने कोणी आत्महत्या केली, त्याने का केली अजून, स्पष्ट झाले नाही आणि माझ्या माहिती प्रमाणे 5 मेरिट लिस्ट लागतात, पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही आले म्हणून काय आत्महत्या करायची?
असल्या विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार झाले असावे हे लोकांना कळतंय.
बाकीचे पण विद्यार्थी आहेत ना त्यांनी का नाही केली आत्महत्या?

हाच एक ओपन मध्ये होता का?
बाकीचे पण ओपन मध्ये आहेत ना त्यांचा लिस्ट मध्ये नंबर लागला मग काय ते बोलले की आरक्षण आहे म्हणून माझा नंबर लागला नाही?

ओपन कॅटगेरीसाठी
SC वर्गासाठी
ST वर्गासाठी
OBC वर्गासाठी
प्रत्येकाचा वाटा कायद्याप्रमाणे आहे ना.

मग वेगळा issue करायचा काय मतलब आहे. २६ जानेवारी १९५० नंतर सुद्धा तुम्ही कायद्याचे उल्लंघन करत आहात (भारतीय संविधान मधील अनुच्छेद १८ वाचा) अजून ही तुम्ही तुमचे आडनाव लावत नाही? सुरुवातीला छत्रपती आणि शेवटी महाराज (अपवाद छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज)
म्हणजे तुमच्या डोक्यातून अजून राजे महाराज नावाचे आरक्षण जात नाही आणि तुम्ही बोलता #आरक्षण_गेले_खड्ड्यात
ज्या भारतीय संविधानानुसार राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेत तुम्हाला सदस्य म्हणून संधी (प्रतिनिधित्व) उपलब्ध करून दिली, निदान तेवढे तरी इमान ठेवायचे.

आरक्षण, बद्दल तुमच्या सारख्या लोकांच्या मेंदू मध्ये एवढे द्वेष आहे, याला कारण एकच आहे, तुम्हाला जातीयचे चटके थोडे सुद्धा स्पर्श झाले नाही.

छत्रपती शाहू महाराज हे दत्तक होते, त्यांच्या रक्तात खरंच बहुजन वर्गाचे विचारांचे अंश होते, १८९९ साली वेदोक्त प्रकरण तुम्ही वाचले असावे?
१९०२ साली दस्तुरखुद्द छत्रपती शाहू महाराज यांनी स्वतःच्या राज्यात प्रथम आरक्षणाची तरतूद करून ठेवली.

५०% बहुजन वर्गाला
५०% ओपन कॅटेगरी वर्गाला

जेव्हा छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यात प्रथम लागू केले तेव्हा, बाळ गंगाधर टिळक नावाच्या व्यक्तीने विरोध केला?
"तेली तांबोळी आणि कुणबट्यानी (कुणबट ही जात आहे) संसदेत जाऊन काय नांगर हाकायचे आहे का!"

म्हणजे तत्कालीन जे कोणी ब्राह्मण होते त्यांना छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या आरक्षणाला नुसता विरोध नव्हता तर, द्वेष होता त्वेष होता?

आणि तुम्ही आजच्या ब्राह्मणांच्या ब्राह्मण्यवादाला बळी पडलात मला हसू येतंय, तुमच्यावर की तुम्ही खरंच छत्रपती शाहू महाराज यांचे विचार वाचले आहेत का?
त्यांचा लढा वाचला आहे का?
त्यांच्या विचारांचे पाहुलखुणा पाहण्याचा प्रयत्न केला आहे का?
किंवा छत्रपती शाहू महाराज यांचा दूरदृष्टिकोन पाहिलात का?

तुमच्या बोलण्यातुन हेच दिसून आले की तुम्ही ब्राह्मण्यावादाच्या पूर्णपणे आहारी गेला आहात.
१९१८ साली टिळक  #अथणी (महाराष्ट्र-बेळगावच्या मध्ये) येथे जाहीर सभेत बोलले, "तेली तांबोळी आणि कुणबट्यानी (कुणबट ही जात आहे, कुणबट्यानी म्हणजे त्वेषाने बोललेले) संसदेत जाऊन काय नांगर हाकायचे आहे का!"
नंतर पुन्हा टिळकांनी पंढरपूर येथे सुद्धा जाहीर सभा घेऊन आरक्षणाला कडाडून विरोध केला. त्याच सभेमध्ये समोरच एक व्यक्ती बसलेले होते टिळकांनी त्यांना पाचारण केले बोलण्यासाठी, ते व्यक्ती स्टेजवर आले आणि बोलायला सुरुवात केली, काय बोलले ते व्यक्ती, टिळक महाराज म्या काय बोलणार, आमी काय धोबी, परीट वर्षानुवर्षे आमी तुमच्या लोकांचे कपडे धुणे करतो, तुम्ही आता बोलतात, "तेली तांबोळी आणि कुणबट्यानी संसदेत जाऊन काय नांगर हाकायचे आहे का!" मग एक काम करा आमच्या सर्वांना तुमी #बामण बनवा म्हणजे सगळेच संसदेमध्ये जातील.
त्या व्यक्तीचे नाव आहे #संत_गाडगे_महाराज.

एवढा इतिहास तुमच्या सारख्या माणसाला माहीत नाही म्हणजे तुमची खरंच ब्राह्मणांच्या आहारी गेलात.

शेवटी एवढेच सांगतो, ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यात आरक्षणाची तरतूद केली तेव्हा तत्कालीन धर्ममार्तंड कर्मठ लोकांनी विरोध केलाच होता, त्याचा नमुना सांगतो,
सांगली मधील #पटवर्धन नावाचे संस्थानिक होते, आता हे पटवर्धन कोण तर मैने प्यार किया फिल्म मधील सलमान खानची हिरोइन #भाग्यश्री_पटवर्धन हिचे आजोबा होते.
त्यांनी त्यांच्या संस्थेमधील वकील अभ्यंकर यांना कोल्हापूर येथे पाठविले,
अभ्यंकर कोल्हापूर ला आले आणि छत्रपती शाहू महाराज यांना भेटले, शाहू महाराज आले तेव्हा अभ्यंकर यांना विचारले की काय झाले, अभ्यंकर बोलले की, "तुम्ही आरक्षण चालू केले आहे त्यामुळे तुम्ही आमच्यावर अन्याय केला आहे? आरक्षण तुम्ही लायकी बघून द्यावे जो लायकीचा नसेल त्याला आरक्षण देऊ नये." असे पटवर्धन यांनी तुम्हाला सांगण्यासाठी मला पाठविले आहे.

सर्व ऐकून झाल्यावर छत्रपती शाहू महाराज यांनी वकील अभ्यंकर यांना घोड्याच्या तबेल्यात घेऊन गेले, त्यांच्या सेवकाला सांगितले की प्रत्येक घोड्याला बाहेर काढा, समोरच्या मैदानावर एक चटई टाका आणि त्यामध्ये हरभरे (चणे) सर्व टाकून द्या, हे सर्व वकील अभ्यंकर बघत होते पण त्यांना काहीच कळत नव्हते.
त्यानंतर सर्व घोडे आले चणे खाण्यासाठी, आणि घोडे एकमेकांवर तुटून पडलेले आहेत, चणे खाण्यासाठी आणि विशेष बाब म्हणजे त्यामध्ये काही घोडे सशक्त होते, आणि काही घोडे कमजोर होते.
जे कमजोर होते ते चणे खाण्यासाठी प्रयत्न करत होते पण, जे सशक्त घोडे होते ते त्यांना खाऊन देत नव्हते.
 पण कमजोर घोडे, सशक्त घोड्यांचे #लाता खात होते.
हे सर्व अभ्यंकर पाहत असताना त्यांना काहीच कळत नव्हते, यावर छत्रपती शाहू महाराज बोलले की, पाहिलेत का अभ्यंकर जे सशक्त घोडे आहेत, ते कमजोर घोड्याना चणे खाऊन देत नाही, हे असेच होणार आहे म्हणून मी प्रत्येक घोड्याचा खाण्याचा वाटा त्यांच्या तोंडाजवळच ठेवले आहे, कारण ते इतर कोणाचा वाटा खाणार नाहीत.
एवढे बोलल्यावर अभ्यंकर चिडीचूप झाले.
शाहू महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे बोलले अभ्यंकर, जाती जनावऱ्यामध्ये असतात, माणसात नाही!
परंतु तुम्ही (ब्राह्मणानी) लोकांनी माणसामध्ये जाती निर्माण करून त्यांना जनावऱ्यासारखी वागवणूक देत आहात
म्हणून मी माझ्या राज्यात बहुजन वर्गाला आरक्षणाची तरतूद करून ठेवली आहे.
यावर अभ्यंकर यांना सगळे काही समजले की छत्रपती शाहू महाराज काय सांगत होते, अभ्यंकरांनी तिथून काढतापाय काढला.
१९२० साली माणगांव येथे बहिष्कृत वर्ग सभे मध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी जाहीर पणे सांगितले की, मला खात्री पटली आहे की, डॉ. भीमराव आंबेडकर तुमचा उद्धार करणार आहेत, तुमच्या न्याय हक्कासाठी लढणार आहेत, आणि एक दिवस ते या भारताचे मोठे नेते होणार आहेत.
छत्रपती शाहू महाराज यांचा अभ्यास प्रचंड होता, त्यांची शिक्षणाची डिग्री सुद्धा भारत बाहेरच्या आहेत म्हणजे त्यांचे शिक्षण हे उच्च स्तरावर होते दूरदृष्टी होती आणि म्हणूनच देशातील बहिष्कृत वर्गाचे नेतृत्व करण्यासाठी, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केली.

म्हणून प्रत्येकाचा वाटा, भारतीय  संविधानाने प्रत्येकाला दिला आहे, त्यामुळे कोणी कोणाचे मेरिट मध्ये घुसून अडमिंशन घेत नाही.
एवढे ज्ञान तुम्हाला असावे.
आणि हो यापुढे तुमच्या असल्या भाषा आम्ही खपवून घेणार नाही.
तुमच्या डोक्यातील राजे महाराजे नावाचे आरक्षण आधी तुम्ही खड्ड्यात घाला, मग भाषा करा आरक्षण गेले खड्ड्यात!

जय भीम जय भारत

अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे

Copy pest whats app
Previous article
Next article

1 Comments

  1. जय भिम साहेब
    जशाच तसेच उत्तर १००%

    ReplyDelete

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel